शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

कुकरमुंडा फाटय़ाजवळ ओव्हरलोड वाहनांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 12:01 IST

संपूर्ण दिवसभर वाहतुकीचा झाला खोळंबा

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार : अंकलेश्वर-ब:हाणपूर राज्य मार्गावरील कुकरमुंडा फाटय़ाजवळ ेसोयाबीनची पोते भरलेला दहा चाकी ओव्हरलोड ट्रक  पलटला. त्यामुळे या मार्गावरील ओव्हरलोड वाहनांच्या वाहतुकीची समस्या पुन्हा ऐरणीवर आली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी की, ट्रक क्ऱ एमएच 18 डी 3144 हा वाशिम येथून गुजरातमधील गांधीधाम येथे सोयाबिन घेऊन जात होता. सोमवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास  कुकरमुंडा फाटय़ाजवळ क्षमतेपेक्षा अधिक सोयाबिनचा माल यात असल्याने हा ट्रक उलटला. सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रकारची जिवीत हानी झाली नाही. परंतु या मार्गावरील ओव्हरलोडेड वाहतुकीची समस्या मात्र यातून जाणवू लागली आह़े या अपघातानंतर ट्रक चालक व सहचालक हे समोरील काच फोडून गाडीच्या बाहेर निघाले.ट्रक उलटल्यामुळे ट्रक मध्ये असणारी सोयाबीनची पोती रस्त्याच्या कडेला पसरली. ट्रक पलटल्यामुळे राज्यमार्गावरील वाहतुकीला सोमवारी मोठय़ा प्रमाणात अडथळे निर्माण झाले होत़े सोमवारी सकाळपासून रस्त्याच्या कडेलगत फेकले गेलेले सोयाबीनचे पोते पर्यायी वाहनांमध्ये मध्ये भरण्यात येत होत़े तसेच पलटलेला ट्रकदेखील रस्त्यावरून हटविण्याचे प्रय} करण्यात येत होते.त्यामुळे सोमवारी घटनास्थळी मोठय़ा प्रमाणात वाहतुककोंडी निर्माण झाली होती. पोलीस कर्मचा:यांनी सोमवारपासून घटनास्थळी हजर राहून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रय} केला.या अपघाताबाबत चालकाशी संपर्क केला असता त्याने सांगितले की, समोरून येणा:या भरधाव वाहनाने कट मारला. त्यामुळे ट्रक वेगात असताना रस्त्याच्या खाली उतरला. रस्त्यावरील खड्डे व साईडपट्टयांमुळे ट्रक वरील नियंत्रण सुटले व ट्रक पलटला. असे असले तरी हा ट्रक पलटी होण्यामागे ट्रक ओव्हरलोड भरलेला असणे देखील महत्वाचे कारण होते.अंकलेश्वर-ब:हाणपुर राज्य मार्गावर ओव्हरलोड वाहतुकीमुळे वाहने पलटी होण्याचे प्रकार सातत्याने घडून येत असतात. वर्षभर राज्यमार्गावर क्षमता व मर्यादेपेक्षा अधिक सामग्री भरून धावत असतात. तरी संबधित विभागाकडून त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची ठोस कारवाई होतांना दिसून येत नाही. दोन-चार वाहनांवर नावापुरती कारवाई करून इतर बेशिस्त वाहनांना अभय दिले जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. राज्य मार्गावरील ही ओव्हरलोड वाहतूक जीवघेणी ठरत असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.