पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीत गेल्या १० वर्षांपासून सरपंचांसह सर्व सदस्य महिला आहेत. महिलाराज म्हणून ओळखले जाते. सरपंच ज्योतिबाई पांडुरंग पाटील व त्यांच्या सर्व महिला सदस्य विविध उपक्रम राबवत असतात. राष्ट्रीय व राज्य पातळीवरील अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीला प्राप्त झालेले आहेत. गाव कोरोनामुक्त व्हावे म्हणून सुरुवातीपासून प्रयत्न करण्यात आले. गावात स्वच्छता, कचरा संकलन करण्यासाठी घंटागाडी, लसीकरण करण्यासाठी जनजागृती प्रचार, रॅली काढून गावात १०० टक्के लसीकरण करण्यात आले. पुरुषोत्तमनगर गावात सातपुडा साखर कारखाना परिसरात सर्वत्र ऑक्सिजन देणाऱ्या हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. गावातील सर्व रुग्णांची तपासणी करून स्वतंत्र उपचार यंत्रणा राबविण्यात आली. आज हे गाव कोरोनातून मुक्त झाले असून, जिल्ह्यात पहिला बहुमान मिळवला आहे. पुरुषोत्तमनगर ग्रामपंचायतीचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी व जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी कौतुक केले होते. गाव १०० टक्के कोरोनामुक्त करण्यासाठी कारखान्याचे अध्यक्ष दीपक पाटील, कार्यकारी संचालक पी. आर. पाटील. प्रा. मकरंद पाटील यांचे मार्गदर्शन लाभले, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण पाटील यांनी दिली.
पुरुषोत्तमनगर गाव कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:23 IST