शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मोबाईल ‘फिवर’च्या दुष्परिणामांची देखाव्याव्दारे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 12:11 IST

देखावा : कुणबी पाटील युवा मंचचा उपक्रम

नंदुरबार : नंदुरबार येथील कुणबी पाटील युवा मंचतर्फे दरवर्षी प्रमाणे यंदाही सामाजिक संदेश देणारा देखावा साकारण्यात आला आह़े यंदा मोबाईलच्या अतिरेकामुळे कोणत्या गंभीर संकटांना सामोरे जावे लागू शकते याचा चित्तथरारक देखावा साकारण्यात आला आह़ेमागील वर्षी मंडळाकडून व्यसनामुळे होणा:या गंभीर परिणामांची माहिती देण्यात आलेली होती़ दरवर्षी युवा मंचच्या कार्यकत्र्याकडून नवनवीन संकल्पनांवर आधारीत देखावे साकारण्यात येत असतात़ यंदा मोबाईलच्या अतिवापरामुळे कोणते अपघात होऊ शकतात़ यावर मंचाकडून देखावा साकारण्यात आला आह़े ‘सेल्फी ठरतोय जीवघेणा’ या संकल्पनेवर देखावा आह़े देखाव्यात एका उंच टेकडीवर सेल्फी काढत असताना जागेचा अंदाज न आल्याने खोल दरीत पडलेल्या एका युवकाचा प्रसंग दाखवण्यात आला आह़े सेल्फी काढण्यात सध्याचा युवकवर्ग इतका दंग आहे की आपल्या अवतीभोवती काय सुरु आहे, याचीही तसदी संबंधितांकडून घेतली जात नसल्याचेच यातून वर्णन केले जात आह़े यावेळी होणा:या आवाज व युवक दरीत पडत असतानाच्या प्रसंगामुळे देखावा पाहण्यासाठी आलेले भाविक अवाक झाल्याशिवाय राहत नाहीत़ दुस:या एका प्रसंगात एक युवती मोबाईलवर बोलत असताना रस्त्यावरुन चालत असत़े मोबाईलवर बोलत असताना रस्त्यावर चालने धोक्याचे असल्याचे वारंवार जेष्ठांकडून सांगण्यात आल्यावरही युवती याकडे कानाडोळा करते व क्षणात एक वाहन युवतीस जोरदार धडक देत अपघात होतो़ व यात ती गतप्राण झाल्याचे दाखवण्यात आले आह़े त्यामुळे मोबाईलवर बोलत असताना वाहन चालवणे, रस्ता ओलांडणे आदी कुठलेही काम करु नका असा संदेश यातून देण्यात आलेला आह़े तिस:या एका प्रसंगात दोन मित्रांचे मोबाईलवर संभाषण दाखवले आह़े या प्रसंगात जोरदार पाऊस पडत असून विजांचा कडकडाट होत असल्याचे दाखवण्यात आले आह़े वातावरण योग्य नसतानासुध्दा मित्रासोबत मोबाईलवर बोलने चांगलेच महाग पडत़े जोरदार आवाज करत वीज एका मित्राच्या अंगावर पडल्याचे दृष्य़ांमध्ये दाखवण्यात आलेले आह़े चौथा प्रसंग मोबाईलवरील जीवाघेणा गेमवर आधारीत आह़े एक मुलगा मोबाईलवरील धोकेदायक गेमच्या आहारी जावून कालांतराने आत्महत्या करीत असल्याचे दाखवण्यात आले आह़े सध्या मोमो चॅलेंज, ब्लू व्हेल सारखे धोकेदायक व्हीडीओ गेममुळे विद्यार्थी त्याच्या आहारी जात आत्महत्या करीत असल्याचे दिसून येत आह़े त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याकडे नीट लक्ष देऊन त्याला दिलेल्या मोबाईलचा वापर तो कसा करीत आहे हे बघणे महत्वाचे असल्याचा संदेश या देखाव्यांमधून देण्यात आलेला आह़े