शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेबाबत जनजागृती उपाययोजना मात्र शून्य : धडगाव येथील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 11:50 IST

शौचालयांअभावी नागरिकांची गैरसोय

लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : शहरात स्वच्छतागृह व सार्वजनिक शौचालय नसल्याने नागरिकांचे मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. येथे तत्काळ स्वच्छतागृह व शौचालय बांधून नागरिकांची गैरसोय दूर करण्याची गरज आहे. स्वच्छतेबाबत गाजावाजा करीत जनजागृती केली जात आहे मात्र उपाययोजना होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.धडगाव, रोषमाळ बुद्रुक, वडफळ्या व जुने धडगाव मिळून तयार झालेल्या धडगाव नगरपंचायत अंतर्गत येणा:या परिसरात आतार्पयत एकही स्वच्छतागृह व सार्वजनिक शौचालय बांधण्यात आले नाही. ग्रामपंचायतीचे अस्तित्व असतांनाही स्वच्छतागृह व शौचालय बांधण्याबाबत दुर्लक्ष केले होते. नव्याने नगरपंचायत अस्तित्वात आल्यावर धडगाव शहरवासीयांची मोठी आशा होती. परंतु नगरपंचायत अस्तित्वात येवून दोन वर्षापेक्षाही जास्त कालावधी लोटून नागरिकांच्या पदरी निराशाच पडल्याचे दिसून येत आहे. स्वच्छतेविषयी तालुक्यात मोठा गाजावाजा करून जनजागृती केली जात आहे. त्यात अधिका:यांच्या बैठका, पथनाटय़, व शहरात वेगवेगळ्या ठिकाणी भिंतींवर घोषवाक्य लिहीणे, पोस्टर लावणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने स्वच्छतेविषयी नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. परंतु झपाटय़ाने वाढणा:या धडगाव शहरात स्वच्छतागृह व शौचालय बांधण्याविषयी प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.मिळालेल्या माहितीनुसार, शहरात तीन ठिकाणी स्वच्छतागृह बांधणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु तेथेही जागेचा वाद असल्यामुळे तात्पुरते स्थगित करण्यात आल्याचे समजते. बसस्थानकात तोडके-मोडके का असेना स्वच्छतागृह होते. त्याचा वापरही केला जात होता. जास्त खराब झाल्यामुळे ते नगरपंचायतीने ताब्यात घेऊन नवीन बांधकाम करण्यासाठी पाडण्यात आले. बसस्थानकातील स्वच्छतागृह पाडून चार ते पाच महिन्याचा कालावधी झाला. परंतु त्या बांधकामाविषयी काहीच केले जात नसल्याचे दिसून येत आहे. आता मात्र शहरातील व तालुक्यातील बाजारात येणा:या नागरिकांना उघडय़ावर शौचास व लघुशंकेसाठी जाण्यास भाग पाडले जात आहे.एकंदरीत स्वच्छतागृह व शौचालय बांधून ख:या अर्थाने धडगाव शहरातील नागरिकांना न्याय मिळवून देऊन होणारे हाल थांबवण्याची गरज आहे.