शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार एड्स नियंत्रण विभागातर्फे एड्समुक्त गावासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागातर्फे  एड्सला हद्दपार करण्यासाठी गाव पातळीपासून सुरुवात करण्यात आली आह़े अधिकारी व कर्मचा:यांकडून ‘एड्समुक्त गाव’ हे अभियान राबविण्यात येत आह़े त्याच बरोबर गावातील तरुण-तरुणींना लगAाआधी ‘एचआयव्ही’ची तपासणी करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आह़ेदेशासह संपूर्ण जगाला एड्सची समस्या  जाणवत आह़े त्यामुळे केंद्रासह राज्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागातर्फे  एड्सला हद्दपार करण्यासाठी गाव पातळीपासून सुरुवात करण्यात आली आह़े अधिकारी व कर्मचा:यांकडून ‘एड्समुक्त गाव’ हे अभियान राबविण्यात येत आह़े त्याच बरोबर गावातील तरुण-तरुणींना लगAाआधी ‘एचआयव्ही’ची तपासणी करण्याबाबत समुपदेशन करण्यात येत आह़ेदेशासह संपूर्ण जगाला एड्सची समस्या  जाणवत आह़े त्यामुळे केंद्रासह राज्य सरकारही एड्स नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या योजना, उपक्रम राबवित आह़े एड्स बाबत असलेले समज, गैरसमज यांची माहिती तरुणाईला मिळावी यासाठी  जिल्हा प्रशासनाकडूनही मोठय़ा प्रमाणात प्रयत्न करण्यात येत आह़े त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा एड्स नियंत्रण प्रतिबंधक विभागाकडून तरुणाईच्या समुपदेशनावर अधिक भर देण्यात येत आह़े ग्रामपंचातीकडूनही होतोय ठराव़़‘एड्समुक्त गाव’ ही संकल्पना राबविण्यासाठी ग्रामपंचायतही महत्वाची भुमिका पार पाडत आह़े लगAाआधी तरुणाईने एचआयव्हीची तपासणी करावी असे ठराव ग्रामपंचातीकडून मांडले जात आह़े जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाकडून दर महिन्याला एचआयव्ही तपासणीसाठी आलेल्या सुमारे 10 हजार रुग्णांचे समुपदेशन करण्यात येत आह़े एड्सबद्दल त्यांच्या मनात असलेली भिती घालवण्यात येत आह़े जिल्ह्यातील 1 जिल्हा सामान्य रुग्णालय, 2 उपजिल्हा रुग्णालये, 14 ग्रामीण रुग्णालय, 59 प्राथमिक आरोग्य केंद्र आदींमध्ये मोठय़ा प्रमाणात एड्स नियंत्रण व प्रतिबंधक विभागाचे काम सुरु आह़े महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण विभागाकडून महिन्याला मुबलक प्रमाणात औषधीं तसेच इतर किटचा पुरवठा करण्यात येत आह़े जिल्ह्यात साधारणत चार हजार 300 एचआयव्ही बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आह़े त्यातील साडेतीन हजार रुग्ण जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार घेत आह़े यात गुजरात राज्याच्या सिमावर्ती भागातीलही रुग्णांचा समावेश  आहेत़ एड्सला हद्दपार करण्यासाठी जिल्हा एड्स नियंत्रण विभागाकडून युध्दपातळीवर प्रयत्न करण्यात येत आह़े त्यासाठी गावोगावी जाऊन ग्रामस्थांमध्ये आजाराबाबत जनजागृती करण्यात येत आह़े एचआयव्ही समुपदेशनासाठी जिल्हा प्रशासनाकडून टोल फ्री नंबरदेखील उपलब्ध करुन देण्यात आला आह़े बहुतेक रुग्ण हे थेट रुग्णालयात येण्यास धजावत नाहीत त्यामुळे अशांसाठी दुरध्वनीवरुन चौकशी तसेच समुपदेशनाची             सोयही उपलब्ध करुन देण्यात आली आह़े