शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यात 50 स्टॉलद्वारे योजनांची जनजागृती : महाराजस्व अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 12:36 IST

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा ...

ऑनलाईन लोकमतशहादा, दि़ 24 : जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी येथे महाराजस्व अभियानांतर्गत शासकीय सेवा व रोजगार महामेळावा घेण्यात आला. येथील बाजार समितीच्या आवारात झालेल्या या महामेळाव्यात विविध शासकीय विभागांतर्फे योजनांची माहिती देण्यासाठी सुमारे 50 स्टॉल लावण्यात आले होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे होते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, ए.ए. शेख, जिल्हा न्यायधीश पी.बी. गायवाड, नगराध्यक्ष मोतीलाल पाटील, जिल्हा सरकारी वकील सुशील पंडित, प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, गटविकास अधिकारी श्रीराम कागणे, नायब तहसीलदार डॉ.उल्हास देवरे, वाय.डी. पटेल, वकील संघाचे अध्यक्ष एम.एन. पाटील आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महामेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले.या वेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी म्हणाले की, न्याय मिळविण्यासाठी न्यायालये आहेत. सद्यस्थितीत न्यायालयांमध्ये अनेक खटले प्रलंबित आहेत. या खटल्यांची संख्या वाढू नये म्हणून लहान तंटे गावपातळीवर मिटवले गेले पाहिजे. त्यासाठी शासनाने गाव पातळीवर तंटामुक्त समिती स्थापन केल्या आहेत. शासकीय योजनांची गाव पातळीर्पयत माहिती नसल्याने या योजना प्रभावीपणे राबविण्यास अडचण येते. मात्र शासकीय योजनांची माहिती जनतेर्पयत पोहोचविण्यासाठी वृत्तपत्रे मोठी भूमिका बजावत आहेत. शासनाच्या सर्वच योजना प्रभावीपणे राबविण्यासाठी सामाजिक संस्था व लोकांचा सहभाग असावा. जलयुक्त शिवार, पाणी अडवा-पाणी जिरवा योजनांसाठी ग्रामपंचायतींची मोठी जबाबदारी असल्याचे ते म्हणाले.केंद्र व राज्य शासनाने आखून दिलेल्या विविध योजनांची माहिती पात्र लाभार्थीर्पयत पोहोचली पाहिजे हा मूळ उद्देश कार्यशाळेचा असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश वाघवसे यांनी सांगितले. प्रास्ताविक तहसीलदार मनोज खैरनार यांनी केले. सूत्रसंचालन आशा सोनवणे यांनी तर आभार अ‍ॅड.सुशील पंडित यांनी मानले.