शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

कामबंदला बगल देत प्राध्यापकांचे ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:51 IST

नंदुरबार : विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापक संघटनांकडून कामबंद आंदोलनाला बगल देत महाविद्यालयीन सर्व कामे करुन झाल्यावर  त्या-त्या महाविद्यालयात ठिय्या आंदोलनात सहभाग घेण्यात येत आह़े विविध 15 मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनांतर्फे गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेले आह़े परंतु सध्या विविध प्रॅक्टीकल व सेमीस्टर परीक्षा असल्याने यातून विद्याथ्र्याचे नुकसान ...

नंदुरबार : विद्याथ्र्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी प्राध्यापक संघटनांकडून कामबंद आंदोलनाला बगल देत महाविद्यालयीन सर्व कामे करुन झाल्यावर  त्या-त्या महाविद्यालयात ठिय्या आंदोलनात सहभाग घेण्यात येत आह़े विविध 15 मागण्यांसाठी प्राध्यापक संघटनांतर्फे गेल्या काही दिवसांपासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आलेले आह़े परंतु सध्या विविध प्रॅक्टीकल व सेमीस्टर परीक्षा असल्याने यातून विद्याथ्र्याचे नुकसान होत असल्याचे ओळखत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत असलेल्या प्राध्यापकांनी कामबंद आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आह़े त्या ऐवजी प्राध्यापकांकडून संपूर्ण महाविद्यालयीन काम आटोपून त्या-त्या महाविद्यालयात ठिया आंदोलन करण्यात येत असल्याची माहिती एऩ मुक्टोचे जिल्हाध्यक्ष डॉ़ सी़पी़ सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़मोठय़ा प्रमाणावर बेरोजगारीचा प्रश्न वाढला आह़े नेट-सेटच्या माध्यमातून प्राध्यापकाच्या नोकरीसाठी विद्यार्थी प्रयत्नशिल असतात़ मात्र, प्राध्यापकांची भरती प्रक्रिया होत नसल्याने नेट-सेट परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्याथ्र्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध होत नसल्याने विद्याथ्र्याकडूनही आता प्राध्यापक आंदोलनाला पाठींबा देण्यात येत असल्याचा  दावा संघटनांकडून करण्यात येत आह़े त्याच प्रमाणे प्राध्यापक विद्याथ्र्याचे नुकसान होऊ न देता सनदशिर मार्गाने ठिय्या आंदोलन करीत असल्याने विद्याथ्र्याकडून समाधान व्यक्त करण्यात येत आह़े त्यामुळे सरकारने प्राध्यापक संपातील प्राध्यापकांच्या भरतीप्रक्रियेच्या मागणीवर त्वरित निर्णय घ्यावा, असे सांगण्यात येत आह़े 11 रोजी धरणे आंदोलनदरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठांतर्गत येणा:या संबंधित सर्व प्राध्यापकांचे जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आह़े यात, खान्देशातून मोठय़ा संख्येने प्राध्यापकांनी हजर रहावे असे आयोजकांकडून सांगण्यात येत          आह़ेप्राध्यापक संघटनांकडून जळगाव येथे जिल्हाधिका:यांना निवेदन देण्यात येऊन प्राध्यापकांच्या मागण्या शासनार्पयत पोहचवण्याची मागणी करण्यात येणार आह़े दरम्यान, शासनाने आंदोलनाला गांभीर्याने घेत मागण्यांची पूर्तता करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आलेला आह़े पश्चिम महाराष्ट्रात प्राध्यापकांचे तीव्र आंदोलन सुरु आह़े त्यामुळे याचा परिणाम खान्देशातही जाणवतोय की काय? अशी चिंता विद्याथ्र्यासह पालकांना होती़ परंतु प्राध्यापक संघटनांनी दाखवलेल्या संयमामुळे पालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आह़ेदरम्यान, 11 ऑक्टोबर रोजी जळगावात खान्देशातून आलेल्या प्राध्यापकांचे धरणे आंदोलन होणार आह़े यानंतर प्राध्यापक संघटनांची बैठकही होण्याची माहिती मिळत आह़े यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आह़े दरम्यान, तोवर प्राध्यापकांकडून त्या-त्या महाविद्यालयांमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात येणार आह़े