शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

नर्मदा आंदोलकांचे ठिय्या आंदोलन

By admin | Updated: January 24, 2017 00:31 IST

प्रशासनासोबत उशिरार्पयत चर्चा : पोलिसांना न जुमानता आंदोलक घुसले आवारात

नंदुरबार : सरदार सरोवर प्रकल्पबाधितांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. सायंकाळी जिल्हाधिका:यांसह इतर संबधित अधिका:यांनी शिष्टमंडळासोबत चर्चा केली. उशिरार्पयत चर्चा सुरूच होती.सरदार सरोवर प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनासंदर्भात असलेल्या विविध प्रश्नांवर 2 डिसेंबर 2016 रोजी बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी ठरल्याप्रमाणे 130 प्रकल्पबाधितांना जमिनी दाखविण्याचा कार्यक्रम झाला, परंतु त्यात अनेक त्रुटी राहिल्या होत्या. त्यासंदर्भात म्हणणे मांडण्यासाठी प्रकल्पबाधित नर्मदा आंदोलनाच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले. यावेळी मुख्य गेट बंद होते. तेथे एक फौजदार  व पाच पोलीस असतांना त्यांना न जुमानता आंदोलक आवारात घुसले. परंतु मुख्य इमारतीचे तीन गेट बंद करण्यात आल्यानंतर आंदोलक तेथे ठाण मांडून बसले. जिल्हाधिकारी एम.कलशेट्टी यांनी शिष्टमंडळाला पाचारण केले. सायंकाळी उशिरार्पयत चर्चा सुरूच होती. 2 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत जमीन दाखवायच्या प्रत्येक सव्र्हे क्रमांकाची जमीन बघितल्यावर तिथे त्या जमिनीच्या गुणवत्तेबद्दल, त्यातील सिंचन सुविधेबद्दल, त्यावरील इतर समस्यांबाबत कोणत्याही प्रकारची टिप्पणी लिहिण्यात आली नाही. संमतीपत्रकाच्या दोन प्रती बनवून एक प्रत प्रकल्पबाधितांना देणे अपेक्षित होते ते झालेले नाही. प्रकल्पबाधितांनी पसंत केलेल्या जमिनी खरेदी झाल्या किंवा कसे याबाबतदेखील काही माहिती देण्यात आली नाही. 5 डिसेंबर्पयत दाखविण्यात आलेल्या खाजगी जमिनींपैकी कोणती जमीन कोणत्या बाधितांसाठी खरेदी झाली याचा तपशील देण्यात आला नाही. आजर्पयत पसंत केलेल्या जमिनींची पसंतीपत्रके ज्या प्रकल्पबाधितांनी जमिनी पसंत केल्या, त्यांना मिळणे अपेक्षित होते तेही झालेले नाही. त्यामुळे पुनर्वसनाच्या प्रक्रियेत संदिग्धता निर्माण झाली असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या, त्यात अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील मूळ गावात शिल्लक प्रकल्पबाधितांसाठी जमीन दाखविण्यात यावी. खरेदी झालेल्या व बाकी असलेल्या जमिनींची तपशीलवार माहिती मिळावी. 1763 अघोषितांसर्भात सुनावणी होऊन घोषित/अघोषित असा निर्णय झाला किंवा कसा त्याची सद्य:स्थितीचा तपशील मिळावा. वसाहतीतही जमीन घेणे बाकी असलेल्या प्रकल्पबाधितांकरिता आठ किलोमीटरच्या आत खाजगी जमीन दाखविण्याचा कार्यक्रम लावावा. सिंचनसुविधेचा प्रश्न सोडवावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.शिष्टमंडळासोबत जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, उपजिल्हाधिकारी सोपान कासार, नायब तहसीलदार राजेंद्र दराडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. आंदोलकांतर्फे चेतन साळवे, लतिका राजपूत, विजय वळवी, पुन्या वसावे, नुरजी पाडवी, नुरजी वसावे, सियाराम पाडवी, मांगल्या पावरा यांच्यासह प्रकल्पबाधित उपस्थित होते.