लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नंदुरबार पंचायत समितीच्या आरोग्य विभाग यांच्यातर्फे येथे आशा दिनानिमित्त उत्कृष्ट आशा कार्यकर्तींचा सत्कार समारंभ व आशा आरोग्य तपासणी कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमास पं.स. सभापती प्रकाश गावीत, उपसभापती लताबाई पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संजीव वळवी, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर. तडवी, लहान शहादे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सुनील वळवी, पं.स. सदस्या मुन्नीबाई वळवी, सीमाबाई माळी आदी उपस्थित होते. या वेळी गटविकास अधिकारी पटाईत म्हणाले, की ग्रामीण भागात आशांचे मोठे योगदान आहे. दिवसा तर सर्वच काम करतात, पण रात्री-बेरात्री गरोदर मातांना सेवाकार्य देणे हे त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. बालमृत्यू व मातामृत्यू प्रमाण कमी करण्याच्या कार्यात आशा कार्यकर्तींचा मोठा वाटा असून हा सत्कार म्हणजे त्यांच्या या कामाची पावती आहे. असेच कार्य करुन आशा कार्यकर्तींनी आपल्या तालुक्याचे नाव जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आणावे, असे आवाहनही त्यांनी केले. डॉ.सुनील वळवी व डॉ.संजीव वळवी यांनीही मार्गदर्शन केले.कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सात आशा कार्यकर्तींचा गौरव करण्यात आला. त्यात लताबाई रवींद्र चौधरी (पथराई), सखुबाई ओंकार पवार (ठाणेपाडा), अंजना देविदास नरभवर (सुंदरदे), कल्पना प्रदीप वळवी (केसरपाडा), रेखा अशोक नरभवर (पातोंडा), जनाबाई श्रीपत धनगर (आसाणे), नंदा विजय गाभणे (ढंढाणे) आदींचा समावेश होता. तसेच महालॅबमार्फत अबित बागवान, अंजली चौधरी, समीर शेख यांनी आशा कार्यकर्तींची आरोग्य तपासणी केली.प्रास्ताविक प्रसाद सोनार यांनी केले. सूत्रसंचालन भावेश पाटील तर आभार डॉ.जे.आर. तडवी यांनी मानले. कार्यक्रमासाठी गटप्रवर्तक अंजना अंधारे, मंदाकिनी पाटील, रत्ना नंदन, सरला ब्राम्हणे, संगीता बिरारे, अभय चित्ते, सैयद, किशोर मावची, यतीन चव्हाण आदींनी परिश्रम घेतले.
नंदुरबारात आशा कार्यकर्तींचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2020 12:54 IST