शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रुग्णवाहिकांऐवजी पर्यायी व्यवस्थेसाठी प्रस्ताव तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १०८ रुग्णवाहिकेबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता सीएसआर अंतर्गत पर्यायी रुग्णवाहिका व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्ताव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १०८ रुग्णवाहिकेबाबत वाढत्या तक्रारी लक्षात घेता सीएसआर अंतर्गत पर्यायी रुग्णवाहिका व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करावा अशा सुचना खासदार डॅा.हिना गावीत यांनी दिशा समितीच्या बैठकीत दिल्या. जिल्हा विकास समन्वय आणि संनियंत्रण समितीची बैठक खासदार डॉ.हिना गावीत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस आमदार डॉ.विजयकुमार गावीत,आमदार राजेश पाडवी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अशासकीय सदस्य कांतीलाल टाटीया, बबीताताई नाईक, डॉ.स्वप्नील बैसाणे, प्रदीप वळवी आदी उपस्थित होते.यावेळी बीएसएनएल, कृषी, सिंचन, सार्वजनिक वितरण, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, आरोग्य आदी विविध विभागांशी संबंधित केंद्रीय योजनांचा आढावा घेण्यात आला. दुर्गम भागातील नागरिकांना योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याचे निर्देश देताना डॉ.गावीत म्हणाल्या, जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पाच्या सद्यस्थितीबाबत माहिती संकलीत करून सादर करावी. प्रकल्पाचा उपयोग सिंचनासाठी होण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. १०८रुग्णवाहिकेबाबत तक्रारी येत असल्याने सीएसआर अंतर्गत पर्यायी रुग्णवाहिका व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा. ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणीदेण्याचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करण्यात यावे. मुद्रा योजनांचा लाभ गरजू लहान व्यावसायिकांना देण्यासाठी बँकांनी सहकार्य करावे. वनबंधू कल्याण योजनेअंतर्गत नागरिकांचा विमा काढण्यासाठी बँक, गटविकास अधिकारी आणि आदिवासी विभागाने एकत्रितपणे नियोजन करावे. ग्रामीण भागात मनरेगा अंतर्गम कामांची मागणी आल्यास त्वरीत उपलब्ध करून द्यावे व तळोदा आणि धडगाव तालुक्यातील तक्रार असलेल्या कामांची माहिती घ्यावी. ऑनलाईन शिधापत्रिका देण्याचे काम लवकर पूर्ण करावे. कमी धान्य देणाऱ्या रेशन दुकानदारांवर कारवाई करावी. अंगणवाडी बांधकाम व दुरुस्तीची कामे लवकर पूर्ण करावी. बीएसएलने सेवा अधिक सक्षम करण्यासाठी उपाययोजना करावी, असे त्यांनी सांगितले. बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.