शहरं
Join us  
Trending Stories
1
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
3
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
4
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
5
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
6
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
7
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
9
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
10
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
11
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
12
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
13
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
14
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
15
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
16
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
17
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
18
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
19
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
20
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी

२६ वर्गखोल्या बांधकामाचा जि.प.कडे प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २३ शाळांमधील २६ वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरीचा प्रस्ताव येथील पंचायत समितीकडून जिल्हा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या २३ शाळांमधील २६ वर्गखोल्यांच्या बांधकामाला मंजुरीचा प्रस्ताव येथील पंचायत समितीकडून जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला असून, आता जिल्हा परिषद प्रशासनाने दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन तातडीने कार्यवाही करण्याची अपेक्षा पालकांनी व्यक्त केली आहे.तळोदा तालुक्यातील रानमहू, अमोनी, खुषगव्हाण, राजविहीर, बियामाळ, पिंपरपाडा, मेंडवढ, गव्हाणीपाडा, अंमलपाडा, रतनपाडा, पांडुरके, चौगाव खुर्द, आष्टे, कळमसरे, नवे सिंलींगपूर, टाकळी, जामोनीपाडा, सितापावली, बंधारा, धनपूर, वरपाडा, कोठार, चौगाव बुद्रूक अशा २३ गावांमधील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये वर्ग खोल्यांचा अभाव आहे. त्यामुळे तेथील आदिवासी विद्यार्थ्यांपुढे गैरसोय निर्माण झाली आहे. वर्ग खोल्यांअभावी विद्यार्थ्यांना एकाच वर्गात दाटी-वाटीने बसावे लागत असते. यातील बहुतेक शाळा अतिदुर्गम भागात आहेत. त्यामुळे तेथे विद्यार्थ्यांना कुडाच्या कच्च्या घरातच वर्ग भरावे लागत असतात.साहजिकच खोल्यांच्या अडचणीमुळे विद्यार्थ्यांची होत असलेली ससेहोलपट पाहून पालकांनी वर्ग खोल्या बांधण्याची मागणी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांकडे केली होती. या पार्श्वभूमीवर तळोदा पंचायत समितीने या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांच्या साधारण २६ वर्ग खोल्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे नुकताच पाठविला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पंचायत समितीकडून पाठविलेल्या प्रस्तावावर तातडीने कार्यवाही करून मंजुर करण्यात यावे, अशी पालकांची मागणी आहे. याप्रकरणी जिल्हा विकास नियोजन समितीच्या बैठकीतदेखील पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुद्दा उपस्थित केला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने संबंधीत विभागांना याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. साहजिकच येथील पंचायत समितीने खोल्यांचा प्रस्ताव युद्ध पातळीवर तयार करून पाठविला आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांनीदेखील सकारात्मक दृष्टीकोण ठेवून दुर्गम आदिवासी विद्यार्थ्यांची अडचण दूर करावी, अशी अपेक्षा आहे.४कोठार, तोलाचापल, लक्कडकोट, खर्डी, बंधारा या मार्गे जाणारी राणीपूर-तळोदा बस ही गेल्या दिवाळीपासून म्हणजे चार महिन्यांपासून बंद करण्यात आली आहे. त्यामुळे या परिसरातील प्रवाशी व विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. बस फेºयांअभावी विद्यार्थ्यांना खाजगी वाहनातूनच महागड्या भाड्याने यावे लागत आहे. काही गावांमधील विद्यार्थ्यांना तर पायपीट करत यावे लागत असते. आर्थिक अडचणींमुळे त्यांचे शैक्षणिक नुकसानदेखील होत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले. बंद बसफेºया अक्कलकुवा विभाग नियंत्रकांनी पुन्हा सुरू कराव्यात यासाठी प्रवाशांबरोबरच विद्यार्थ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला असतांना त्याकडे गांभीर्याने लक्ष घातले जात नाही, असा विद्यार्थ्यांचा आरोप आहे. दरम्यान या संतप्त १०० विद्यार्थ्यांनी सोमवारी पंचायत समितीच्या पदाधिकाºयांकडे साकडे घातले होते. त्या वेळी पंचायत समितीच्या बैठकीस आलेल्या महामंडळाच्या अधिकाºयांनाच जाब विचारला. त्या वेयी सभापती यशवंत ठाकरे यांनी याप्रकरणी अधिकाºयांशी चर्चा करून तातडीने तालुक्यातील सर्व बस फेºया चालू करण्याच्या सूचना दिल्या. याशिवाय ज्या ठिकाणी मानव विकास योजनेच्या बस फेºया बंद आहेत. त्याही ताबडतोब चालू करण्याची तंबी अधिकाºयांना दिली. त्यामुळे या मार्गावरील बसफेºया मंगळवारपासून सुरू करण्यात आल्या आहेत. तथापि त्या नियमित अन् वेळेवर कायम स्वरुपी सुरू राहाव्यात, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी केली आहे. अन्यथा याविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारादेखील देण्यात आला आहे.