शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईच्या पाश्र्वभुमीवर नंदुरबारात 57 कुपनलिकांचा प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 12:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरता शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करण्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  आगामी काळात पाणी टंचाईची शक्यता गृहीत धरता शहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करण्याचा प्रस्ताव पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे दिला आहे. याशिवाय शहरालगतच्या परंतु ग्रामिण भागात येणा:या वसाहतींमध्ये पाणी पुरवठा व्हाव यासाठी शहरी भागात कुपनलिका करून ते पाणी संबधीत वसाहतींना पुरविण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणा:या विरचक प्रकल्पातात यंदा अपु:या पजर्न्यमानामुळे अपेक्षीत पाणीसाठा होऊ शकला नाही. त्यामुळे पाणी पुरवठय़ावर परिणाम होण्याची शक्यता आहे. आगामी काळातील संकट लक्षात घेता पालिकेने आतापासूनच पाणी पुरवठय़ाचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे. त्याच अनुषंगाने प्रत्येक प्रभागात कुपनलिका करून मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. सध्या पूर्वीप्रमाणेच पाणीपुरवठासद्य स्थितीत शहरात पूर्वीप्रमाणेच एक दिवसाआड व किमान 45 ते 55 मिनिटे पाणीपुरवठा केला जात आहे. त्यात कुठलीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे सद्यातरी शहरवासीयांना पाणी टंचाईचे संकट फारसे नाही. परंतु येत्या काळात ते जाणवण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाणीपुरवठय़ाचा वेळेत कपात होणे शक्य आहे. अद्याप पालिकेने त्याबाबत कुठलाही निर्णय घेतलेला नाही.विरचकमध्ये 40 टक्के साठाविरचक प्रकल्पात सद्यस्थिती 40 टक्के पाणीसाठा आहे. हाच पाणीसाठा काटकसरीने आणि योग्यरित्या वापरल्यास सात ते आठ महिने हे पाणी पुरेल इतके आहे. याशिवाय पालिकेने आंबेबारा धरणातील पाणीसाठा देखील आरक्षीत केला आहे. आंबेबारा धरणातील पाणी चारीद्वारे आष्टे येथील पंपींग स्टेशनमध्ये आणून तेथून शहराच्या  25 ते 30 टक्के भागाला पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणी टंचाई फारशी जाणवणार नाही अशी एकुणच शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी येणा:या कुठल्याही परिस्थितीला आणि संकटाला सामोरे जाण्यासाठी पालिकेने उपाययोजना आखण्यास सुरुवात केली आहे.कुपनलिकांचा प्रस्तावशहरातील प्रत्येक प्रभागात किमान तीन कुपनलिका करून देण्याची मागणी पालिकेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. जेणेकरून विरचकमधील पाणी पुरवठय़ावर मर्यादा आलीच तर या कुपनलिकांच्या माध्यमातून संबधीत प्रभागांमध्ये पाणीपुरवठा करता येईल. शहरात 19 प्रभाग असून प्रत्येकी तीन कुपनलिका केल्यास त्यांची संख्या तब्बल 57 र्पयत जाणार आहे. शहरात एवढय़ा मोठय़ा प्रमाणात कुपनलिका करून देण्यास प्रशासन तयार होईल किंवा कसे याबाबत मात्र संभ्रमच राहणार आहे. शहराबाहेरील वसाहती तहानलेल्याशहराबाहेरील परंतु लगतच्या गावांच्या हद्दीतील वसाहतींमध्ये सद्य स्थितीत मोठय़ा प्रमाणावर पाणी टंचाई आहे. संबधीत गावांची पाणी पुरवठा योजना मर्यादीत आहे. त्यामुळे नवीन वसाहतींमध्ये पाणी पुरवठा करण्याची क्षमता अशा ग्रामपंचायतींची नाही. परिणामी नागरिकांना खाजगी कुपनलिका कराव्या लागत आहेत. परंतु त्यांनाही अपेक्षीत पाणी लागत नसल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना पाणी विकत घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीत जमिनीची पाणी पातळी खोल गेली आहे. तर शहर हद्दीत पाणी पातळी ब:यापैकी आहे. त्यामुळे शहरी हद्दीत कुपनलिका करून अशा वसाहतींना पाणी पुरवठा करावा अशी मागणी देखील करण्यात येत आहे.