शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
2
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठ्या पर्वाचा अंत; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त
3
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
4
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
5
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
6
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
7
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
8
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
9
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
10
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष
11
AUS vs SA: टॉस जिंकून ऑस्ट्रेलियन कर्णधारानं पहिल्यांदाच घेतला 'असा' निर्णय!
12
तुमच्या नोकऱ्यांचा एआय शत्रू आहे का?
13
मुकेश किंवा नीता अंबानी नाही तर रिलायन्समध्ये सर्वात जास्त शेअर्स कोणाकडे आहेत?
14
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
15
Video - राजस्थानमध्ये पुराचे थैमान; बचावकार्यासाठी येणाऱ्या NDRF जवानांच्या गाडीचा अपघात
16
ऑनलाइन गेमिंगच्या जाळ्यात तुमचाच ‘गेम’ तर होत नाही ना?
17
गणेशमूर्ती प्राणप्रतिष्ठेला ऐन वेळी धावाधाव नको, म्हणून 'ही' घ्या पूजासाहित्याची इत्थंभूत यादी आणि विधी! 
18
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
19
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
20
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही

फरार आरोपींची मालमत्ता जप्त होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 11:20 IST

दहा वर्षांपासून वॉण्टेड : जिल्हा पोलीस दलाची विशेष मोहिम सुरू

नंदुरबार : निवडणुकीची पार्श्वभुमी आणि कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने जिल्हा पोलिसांनी १९ फरारी आरोपींना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली. दरम्यान, हद्दपार असलेला एक जण शहरात आढळून आल्याने त्याला अटक करून त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर सहा महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अबाधीत राहावी यासाठी जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी ही मोहिम सुरू केली आहे.जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न आदी गुन्ह्यातील १९ प्रमुख आरोपींना जेरबंद करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. अशा आरोपींवर सीआरपीसी कलम ८३ अन्वये कारवाई करण्यात येत आहे. या फरार आरोपींमध्ये फत्तेसिंग बावजी मावची रा.तीनटेंभा, ता.नवापूर, टेबरसिंग अलकाऱ्या पावरा रा.चांदसैली, ता.धडगाव, रेवजी कोट्या गावीत, रा.हळदाणी, ता.नवापूर, प्रभाकर भावराव वाघमारे, रा.सिलिंगपूर, ता.तळोदा, वन्या सिंगा वसावे रा.कर्डीबारला, ता.अक्कलकुवा, शेख गणी शेख मोहम्मद रा.शहाआलम बाबा दर्गा अहमदाबाद, जावेदअली उर्फ अमजद अख्तरअली रा.भुसावळ, शेख जमान युसूफअली रा.दिवराज कॉलनी सेंधवा, कुरबानअली सैय्यदअली रा.जाम मोहल्ला, भुसावळ, सिराजअली अस्लबअली रा.जाम मोहल्ला, भुसावळ,गुलाब हुसेन हैदरखान रा.भुसावळ, हमीदखॉ शौकतखाँ पठाण, रा.मोतीबाग, सेंधवा. राजूसिंग रणजितसिंग राजपूत, रा.भोपाळ, अजीजखान बशीरखान फकीर मोहम्मद रा.इंदोर, बालाजी रामकिसन मराठे रा.सुरत, अरमचंद रामा गुजर, रा.भिलवाडा, नौशादअली सिद्दीकी शेख रा.साहेबगंज, अस्मत जंगशेर अली शेख रा.साहेबगंज, शेरसिंग रणसिंग तडवी रा. बडवाणी अशी फरार आरोपींची नावे आहेत.फरार आरोपी पकडण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष पथके तयार करण्यात येवून पथकातील कर्मचारीकडून आरोपींतांच्या घरी , नातेवाईकांकडे तपास करण्यात येत आहे. सर्व पोलीस ठाण्यांना देखील याबाबत कळविण्यात आले आहे. मालमत्तेची माहिती काढल्यानंतर न्यायालयात फौजदारी प्रक्रिया संहितेचा कलम ८३ अन्वये अहवाल सादर करून आरोपीतांच्या मालमत्तेवर जप्ती आणून जप्त मालमत्तेचा लिलाव करण्यात यावा या बाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.