शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

रांझणी परिसरात ‘करपा’चा प्रादुर्भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2017 09:59 IST

शेतकरी चिंतेत : केळी व पपईची पाने वाळली, बुरशीनाशक फवारणीला वेग

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा तालुक्यातील रांझणी, चिनोदा, प्रतापपूर, तळवे मोडसह लगतच्या परिसरात केळी व पपई पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आह़े त्यामुळे शेतक:यांकडूनही चिंता व्यक्त करण्यात येत आह़ेपरिसरात मोठय़ा प्रमाणात केळी व पपई पिक घेण्यात आले आह़े सतत आले हवामान असल्याने या रोगाचा प्रभाव वाढला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले आह़े करपा रोगाची लागण झाली असल्याने शेतक:यांकडून पिक वाचविण्यासाठी धडपड करण्यात येत आह़े करपा रोगाची माहिती मिळताच तालुका कृषी विभागातील कृषी सहाय्यकांकडून प्रत्यक्ष क्षेत्रांची पाहणी करुन शेतक:यांना विविध बुरशीनाशक, किटकनाशक फवारणी करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात    येत आह़े परिसरात केळीवर करपा रोगाच्या प्रादुर्भावामुळे प्रथम पानांवर लहान पिवळसर डाग दिसून येतात़ त्यानंतर  हे ठिपके तपकिरी रंगाचे                      लांबट, गोलाकार होत जाऊन कालांतराने राखाडी कलरचे होतात़ यामुळे पानेदेखील लांबट पध्दतीने फाटत जातात़ या रोगाच्या प्रादुर्भावामुळे केळी पुर्णपणे खराब होत असत़े या  रोगामुळे पपई फळाचाही  आकार कमी होत असल्यामुळे फळाचा दर्जा खालावतो़ त्यामुळे याचा परिणाम उत्पन्नावर होणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े परिसरात पपई पिकही मोठय़ा प्रमाणात घेण्यात आली आहेत़ परंतु या पिकावरही रोगाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे दिसून येत आह़े रोगामुळे पपई पिकाच्या पानावर करडय़ा, तपकिरी रंगाचे ठिपके पडत आहेत़ पानेही पिवळे होत आहेत़ त्यामुळे शेतक:यांमध्ये रोगाविषयी घबराट पसरली आह़े गेल्या अनेक दिवसांपासून या गावातील शेतशिवारात केळी व पपईच्या पिकांच्या पानांचा रंग बदल असल्याचे शेतक:यांना दिसून आले होत़े परंतु हवामानात   होत असलेल्या बदलामुळे याचा प्रभाव काही प्रमाणात पानांवर होत  असल्याचे समजत शेतक:यांनी याकडे दुर्लक्ष केल़े परंतु कालांतराने पिकाच्या पानांचा रंग तपकिरी  होऊन  त्यानंतर पानेदेखील फाटत असल्याचे लक्षात आल्यावर शेतक:यांकडून कृषी विभागातील अधिका:यांना याबाबत माहिती देण्यात आली़ त्यांनतर कृषी विभागाकडून कृषी सहाय्यक तसेच इतरही अधिका:यांनी या क्षेत्रात भेट देऊन पिकांची पाहणी केली़