शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा तालुक्यातील प्रकल्प कोरडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:16 IST

सरासरी पावसाचाअभाव : भूमिगत जलपातळीत होते झपाटय़ाने घट

<p>तळोदा : यंदाचा पावसाळा सुरू होवून जवळपास दीड महिन्याचा कालावधी लोटला आहे, असे असतांना तालुक्यातील लघुसिंचन प्रकल्पांचा जलसाठय़ात वाढ झालेली नाही. सिंगसपूर वगळता इतर पाच प्रकल्पांमध्ये आतापावेतो केवळ पाच टक्के जलसाठा असल्याचे सांगण्यात आले आहे. जलसाठय़ाबाबत गढवली व धनपूर हे तर निरंक आहेत. दरम्यान जुलै अखेर पावेतो तालुक्यात 310 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तालुक्यातील धरणांच्या जलसाठय़ात वाढ होण्यासाठी सलग दमदार पावसाची प्रतिक्षा लागून आहे.हवामान विभागाने यंदा संपूर्ण देशात सरासरी पेक्षा अधिक प्रमाणात पजर्न्यमान राहण्याचा अंदाज पावसापूर्वी व्यक्त केला होता. या खात्याचा अंदाज नंदुरबार जिल्हा वगळता राज्यात इतर सर्वच ठिकाणी खरादेखील ठरला आहे. कारण याठिकाणी मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचे चित्र ही दिसून आले आहे. परंतु हवामान खात्याचा अंदाज सद्यातरी फोलच ठरला आहे. कारण पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिन्याचा कालावधी उलटण्यात आला आहे. तरीही दमदार पाऊस झालेला नाही. जोरदार पावसाअभावी तळोदा तालुक्यातील नदी-नाले अजूनही कोरडे ठाक आहेत. एवढेच नव्हे तर लघुसिंचन प्रकल्पांच्या जलसाठय़ात ही अत्यंत अल्प जलसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे. धुळे येथील लघुसिंचन प्रकल्पाच्या आकडेवारीनुसार सिंगसपूर लघुसिंचन प्रकल्पात थोडय़ा प्रमाणात जलसाठय़ात वाढ झाली आहे. या प्रकल्पात 1.22 दशलक्ष घनमीटर इतका जलसाठा उपलब्ध झाला  आहे. त्या खालोखाल पाढळपूर प्रकल्पात जलसाठा झाला आहे.           येथे 0.44 दशलक्ष घनमीटर           आहे.रोझवा व महुपाडा या प्रकल्पांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात जलसाठा असल्याची स्थिती आहे. गढवली व धनपूर हे दोन्ही प्रकल्प तर जलसाठय़ाबाबत निरंकच असल्याची माहिती देण्यात आली आहे. वास्तविक आतापावेतो निम्मे पावसाळा उलटला आहे. तरीदेखील तालुक्यात अजून पावेतो समाधानकारक पाऊस झालेला नाही. आजही तालुक्यातील ही सिंचन प्रकल्पे भरण्यासाठी सलग जोरदार पावसाची प्रतीक्षा लागून आहे. तुरळीक पावसामुळे सध्या सर्वत्र पिकांची स्थिती उत्तम असली तरी नदी नाले अन् कोरडी धरणांमुळे शेतक:यांना आतापासूनच भूगर्भातील जलपातळीची चिंता सतावत असल्याची व्यथा शेतक:यांनी बोलून दाखविली. गेल्या वर्षी कमी पजर्न्यमानामुळे जमिनीतील पाण्याची पातळी प्रचंड खालावली गेली होती. या वेळी शेतक:यांचे कृषी पंपही मोठय़ा प्रमाणात निकामी झाले होते. साहजिकच यंदातरी तशी परिस्थिती उद्भवू नये अशी शेतक:यांची वरून राजाला प्रार्थना अहे. गेल्या वर्षी जुलै अखेर्पयत तळोदा तालुक्यात साधारण साडे चारशे मि.मी. पेक्षा अधिक पाऊस झाला होता.