शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

प्रकल्पग्रस्तांना तातडीने जमिनी द्याव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 18:32 IST

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील देहली सिंचन प्रकल्पात शेत जमिन बुडालेल्या 129 शेतकरी आणि 64 भूमिहिनांना जमिन देण्याबाबत तातडीने प्रस्ताव ...

तळोदा : अक्कलकुवा तालुक्यातील देहली सिंचन प्रकल्पात शेत जमिन बुडालेल्या 129 शेतकरी आणि 64 भूमिहिनांना जमिन देण्याबाबत तातडीने प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बैठकीत घेण्यात आला़ या धरणातील प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर शासनाने ठोस कार्यवाही केली नाही़ तर पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही प्रकल्पग्रस्तांनी दिली आह़े अक्कलकुवा तालुक्यातील आंबाबारी जवळील देहली सिंचन प्रकल्पास शासनाने सन 1976 साली मंजुरी दिली आह़े प्रत्यक्षात 1984 साली प्रकल्पाचे काम हाती घेण्यात आले आह़े तब्बल 32 वर्षे पूर्ण होऊनदेखील आजपावेतो हा प्रकल्प शासनाकडून मार्गी लागला नाही़ तेव्हाचा अडीच कोटींचा हा प्रकल्प शंभर कोटींच्या वर गेला आह़े या धरणामुळे विस्थापित झालेल्या आंबाबारीवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आह़े अक्कलकुवा तालुक्यातील साधारणत: साडेतीन हजार हेक्टर क्षेत्र या प्रकल्पात ओलीताखाली येणार आह़े तथापि धरणाचा बुडीत क्षेत्रातील 129 शेतक:यांना व 64 भुमिहिनांना अजूनही शासनाकडून जमिनी देण्यात आलेल्या नाहीत़ त्याच बरोबर अनेक प्रश्न आजही कायम आहेत़ या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी गुरुवारी येथील उपविभागीय कार्यालयात लोक संघर्ष मोर्चाच्या पदाधिका:यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती़ या वेळी उपविीागीय अधिकारी विनय गौडा, जिल्हा पुर्नवसन अधिकारी प्रसाद मते, तापी विकास महामंडळाचे सहाय्यक अभियंता सुनील जोशी, लोकसंघर्ष मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा प्रतीभा शिंदे, अक्कलकुवाचे तहसीलदार नितीन देवरे, सुकलाल तडवी, रामदास तडवी, संजय महाजन आदी उपस्थित होत़े या वेळी प्रकलपग्रस्तांच्या प्रस्तावाबाबत सविस्तर आढावा घेऊन त्यावर सखोल चर्चा करण्यात आली़ या प्रकल्पग्रस्तांच्या गावात पुनर्वसनाचे काम चालू असताना शासकीय कर्मचारी प्रत्यक्ष गावक:यांना भेटत नाहीत़ त्यामुळे आमच्या समस्या सुटत नाहीत़ कर्मचारी परस्पर निघून जातात़ त्याच बरोबर तहसीलदारांनादेखील याबाबत निवेदन देण्यात आले आह़े त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही़ अशा अनेक समस्यांचे पाढे बैठकीत वाचण्यात आल़े या प्रकल्पात 129 शेतकरी 64 भुमिहिनांना तत्काळ जमिन उपलब्ध करुन देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णयदेखील या वेळी घेण्यात आला़ त्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा करावा असेही ठरल़े शिवाय सर्व प्रकल्पबाधितांना पुनर्वसन स्थळी दहा हजार निर्वाह भत्ता मिळण्याचा प्रस्तावही मान्य करण्यात आला़ या बैठकीत काथ्याभाऊ  वसावे, कांतीलाल तडवी, हरचंद तडवी, विलास वसावे आदी उपस्थित होत़े