कोरोना संकटामुळे १० महिन्यांपासून महिला एकत्र न आल्याने कार्यक्रमाच्या निमित्ताने भेटीत आनंद व्यक्त केला. कार्यक्रमास भाजप शहादा शहर महिला मोर्चाची नूतन कार्यकारिणी, महिला बचतगट व भावसार समाज महिला मंडळाच्या पदाधिकारी उपस्थित होत्या. भाजप महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा रोहिणी भावसार यांनी सर्व भगिनींशी संवाद साधत यापुढे शहरातील महिलांनी एकजुटीने आणि एकोप्याने काम करावे, असे आवाहन करीत संघटितपणे महिलांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्याचा प्रयत्न असेल. त्यात महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन केले. एकमेकींना हळदी-कुंकू देत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी शहादा शहर भाजप महिला मोर्चाच्या सर्व महिला पदाधिकारी, कार्यकर्त्या तसेच वंदना भावसार, शीला महानुभाव, रूपम सोनी आदींनी सहकार्य केले.
भाजप महिला मोर्चातर्फे शहादा येथे कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:32 IST