शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

योजना राबविण्यात येताय अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2017 12:50 IST

तळोद्यातील पशुपालकांच्या व्यथा : केवळ तीन पशुवैद्यकीय अधिकारी

लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : तळोदा तालुक्यातील पशुवैद्यकीय अधिका:यांच्या मंजुर आठ जागांपैकी पाच जागा रिक्त आहेत़ त्यामुळे संपूर्ण तालुक्याचा कारभार केवळ तीन पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या खांद्यावर आह़े याचा परिणाम म्हणून पशुपालकांच्या विविध अडचणी, शिबीरे घेणे आदी कामांमध्ये याचा परिणाम दिसून येत आह़े पशुवैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त जागांचा सर्वाधिक फटका तळोदा तालुक्यातील बोरद व मोड   येथील पशुपालकांना बसत असल्याचे दिसून येत आह़े  बोरद व मोड मिळून 28 गावे  पशुवैद्यकीय अधिका:यांपासून वंचित आहेत़ त्यामुळे पशुपालकांना व्यवस्थित मार्गदर्शनही मिळत नसल्याच्या व्यस्था पशुपालकांकडून मांडण्यात येत आहेत़ संपूर्ण तालुक्यात केवळ मोड, मोदलपाडा व कोठार याच ठिकाणी पशुवैद्यकीय अधिका:यांची पदे भरण्यात आली आहेत़ तर उर्वरीत प्रतापपूर, सोमावल, बोरद,  तळोदा पंचायत समिती, तालुका  लघु पशु चिकित्सालय तळोदा या ठिकाणी        पशुवैद्यकी अधिकारी नसल्याने पशुपालकांपुढे अनेक समस्या निर्माण होत आहेत़ याबाबत अनेक वेळा ग्रामस्थांकडून अधिकारी वर्गाची भेट घेण्यात आली़ तसेच  रिक्त जागा त्वरीत भरण्यासाठी पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली आह़े परंतु  याकडे वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने हा  प्रश्न प्रलंबितच राहत आह़े  त्यामुळे याचा नेहमीच पशुपालकांना त्रास होत असतो़ सध्या पावसाळा असल्याने संक्रमनाचे दिवस  असतात़ त्यामुळे या दिवसांमध्ये दुभती जनावरे यांना विविध  रोगांची बाधाही होत असत़े परंतु पशुवैद्यकीय अधिका:यांच्या रिक्त जागांमुळे पदावर कार्यरत असलेल्या पशुवैद्यकीय अधिका:यांना सर्व तालुक्याला न्याय देता येणे  शक्य नसत़े परिणामी पशुपालक योग्य मार्गदर्शनापासून वंचित  राहत असतात़ संपूर्ण तालुक्यात केवळ तीनच पशुवैद्यकीय अधिकारी आहेत़ त्यामुळे ब:याच गावांचा अतिरिक्त कार्यभार या तीन पशुवैद्यकीय अधिका:यांना सांभाळावा लागत असतो़ त्यामुळे साहजिकच याचा कामावर प्रचंड परिणाम जाणवत असतो़ वरीष्ठ पातळीवरील प्रशासनाच्या अनास्थेमुळे गेल्या कित्तेक वर्षापासून या रिक्त  जागा भरल्या गेल्या नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन त्वरीत रिक्त जागा भरण्याची मागणी आह़े