शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शहादा तालुक्यातील उजळोद येथे तीव्र पाणीटंचाईची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2019 12:12 IST

शहादा : तालुक्यातील ४१ गावे आणि १५ पाड्यांचा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यात समावेश केला आहे़ यातील बहुतांश गावांमध्ये ...

शहादा : तालुक्यातील ४१ गावे आणि १५ पाड्यांचा जिल्हा प्रशासनाने टंचाई कृती आराखड्यात समावेश केला आहे़ यातील बहुतांश गावांमध्ये पाणीटंचाई दिवसेंदिवस तीव्र होत आहे़ यातील उजळोद येथे भीषण स्थिती असून गावाच्या मधोमध असलेल्या नाल्यात केलेल्या बोअरवेल निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु आहे़शहादा शहरापासून साधारण १५ किलोमीटर पूर्वेला असलेल्या उजळोद गावाची लोकसंख्या ही एक हजार ३३३ एवढी आहे़ गावात एकूण २७३ घरे आहेत़ बहुतांश शेतकरी आणि मजूर कुटूंबांचा रहिवास असलेल्या या गावात गेल्या १५ वर्षात पाणीटंचाईने ग्रासले आहे़ गावासोबत शेतकऱ्यांनी खोदलेल्या बोअरवेल ह्या ७०० फूटापर्यंत आहेत़ ५०० फूटाच्या पुढेच पाणी लागत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ गावाच्या मध्यभागातून नैसर्गिकरित्या उत्तरेकडून वाहत येणारा नाला आहे़ या नाल्यामुळे गावाचे दोन भाग पडले आहेत़ बारमाही नसला तरी पावसाळा आणि नंतरचे दोन महिने पाणी रहात असल्याने १५ वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने येथेच कूपनलिका केली होती़ तत्पूर्वी याच नाल्यात खोदलेल्या विहिरीतून पाणीपुरवठा होत होता़ कूपनलिकेतून साधारण १० वर्षे पाणी मिळाल्यानंतर दूषित आणि क्षारयुक्त पाणी येण्यास सुरुवात झाल्याने ही योजना बंद करुन त्यालगतच दुसरी योजना सुरु करण्यात आली़ यातूनही दूषित पाणी आल्याने दोन्ही योजना बंद करण्यात आल्या आहे़ यातून सातत्याने पाणीटंचाई निर्माण होत असल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण सुरु होती़ एप्रिल २०१८ मध्ये ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ यांच्या सहभागातून गावात तिसरी योजना खोदण्यात आली़ तब्बल ७०० फूट खोल अशा या योजनेतून आता पाणी पुरवठा होत असला तरी तो कधी बंद होईल याची शाश्वती नसल्याने ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ पर्यायी स्त्रोतांसाठी शासनाकडे पाठपुरावा करत आहेत़