लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगणारा कैदीने पोलीसांच्या हातावर तुरी देत जिल्हा रुग्णालयातून पळ काढला़ सोमवारी दुपारी साडेबारा वाजेदरम्यान ही घटना घडली़ तळोदा पोलीस ठाण्यांतर्गत ऑक्टोबर 2010 मध्ये पत्नीचा खून केल्याप्रकरणी देवीप्रसाद उर्फ शशिकांत अवधप्रसाद दिक्षीत याच्यावर गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात आली होती़ त्याला नंदुरबार जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होत़े दरम्यान शनिवारी त्याची प्रकृती खराब झाल्याने कारागृह प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होत़े याठिकाणी उपचार झाल्यानंतर पुढील उपचारासाठी धुळे येथे दाखल करण्यात येणार होत़े यासाठी कारागृह प्रशासनाकडून प्रक्रिया सुरु असताना सोमवारी सकाळी 11़45 ते दुपारी 12़30 वाजेदरम्यान कैदी वार्डात दाखल असलेल्या देवीप्रसाद दिक्षित याने पोलीसांच्या तावडीतून पळ काढला़ याबाबत पोलीस कॉन्स्टेबल सूर्यकांत जयवंत तायडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन देवीप्रसाद दिक्षित याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीसांकडून त्यांचा शोध सुरु आह़े
खुनाच्या गुन्ह्यातील कैदी पोलीसांच्या तावडीतून पसार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2019 12:14 IST