शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

नंदुरबारचे प्राथमिक शिक्षणाधिकारी ५० हजाराची लाच घेतांना जाळ्यात

By मनोज शेलार | Updated: May 15, 2024 20:24 IST

ही कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक नितीन पाटील, हवालदार चौधरी, अनिल गांगोडे,गणेश निंबाळकर यांनी केली.

नंदुरबार: हॉटेल सुरू करण्यासाठी परिसरात असलेली शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी आणि गुजराती शाळेची आरटीई मान्यता वर्धीत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच स्विकारतांना प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांना त्यांच्याच कार्यालयात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याबाबत रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, नवापूर येथील तक्रारदार यांना हाॅटेल सुरू करावयाची होती. परंतु त्या परिसरात बंद पडलेली जिल्हा परिषद शाळेची इमारत असल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने शाळा बंद असल्याचे प्रमाणपत्र त्यांच्याकडे मागितले होते. ते मिळावे यासाठी त्यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांच्याकडे अर्ज केला. तसेच  अशरफभाई माजिदभाई लखानी अल्प संख्यांक विकास बहुउद्देशीय संस्था नवापूर, या संस्थेच्या अंतर्गत येणाऱ्या गुजराथी माद्यमिक विद्यालय नवापूर शाळेची आर टी ई मान्यता वर्धित करण्याचे काम करुन दिल्याचे बदल्यात बक्षीस म्हणून तक्रारदार यांच्याकडून ५० हजार रुपयांची मागणी केली होती.

तक्रारदार यांनी नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. लाचेची रक्कम बुधवारी देण्याचे ठरल्यानुसार शिक्षणाधिकारी सतिष चौधरी यांच्या दालनात चौधरी यांनी लाच स्विकारली. यावेळी पथकाने कारवाई करीत त्यांना रंगेहात पकडले. सायंकाळी झालेल्या या कारवाईने जिल्हा परिषदेत एकच खळबळ उडाली. याबाबत नंदुरबार शहर पोलिसात सतिष सुरेश चौधरी (५२), रा. शांतीनगर, वाघेश्वरी मंदिराजवळ, नंदुरबार, मुळ रा. प्लॉट नंबर ८, गट नंबर ३५, मुक्ताईनगर, जि.जळगांव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरिक्षक नितीन पाटील, हवालदार चौधरी, अनिल गांगोडे,गणेश निंबाळकर यांनी केली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणnandurbar-pcनंदुरबार