दुसरीकडे जानेवारी महिन्यात डिझेल ८२ रुपये, फेब्रुवारी महिन्यात ८७.९६ रुपये, मार्च महिन्यात ८७ रुपये, एप्रिल महिन्यात ८७.३४, तर मे महिन्यात ९१.५५ रुपये प्रती लिटर दराने वाढ झाली आहे. गेल्या दोन महिन्यांत पेट्रोलचे दर ४ रुपये ३४ पैशांनी वाढल्याचे दिसून आले.
पेट्रोलचे दर वाढल्याने सेल कमी झाला आहे. लाॅकडाऊनचा हा परिणाम नाही. नागरिक पेट्रोल टाकण्यात कपात करत आहेत. शहरातील सर्वच ठिकाणी ही स्थिती आहे. कोणत्याही पेट्रोलपंप चालक व मालकासाठी पेट्रोलचे दर कमी असणे फायदेशीर असते. त्यातून त्यांचा व्यवसाय स्थिर राहतो. पेट्रोलपंप ही एक खर्चिक गुंतवणूक असून तूर्तास त्याचा खर्च डिझेल व पेट्रोल दरवाढीमुळे पेलवणे अशक्य झाले आहे.
-संजय अग्रवाल, पेट्रालेपंप चालक, नंदुरबार.