शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात 289 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 21:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील 289 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 197 जणांना अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील 289 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. 197 जणांना अजामिनपात्र वॉरंट काढण्यात आले आहेत. आतार्पयत सहा अनधिकृत शस्त्रे देखील जप्त करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर उपद्रवक्षम लोकांवर आणि संशयीत आरोपींवर कारवाई करण्यात येत आहे. 10 मार्च रोजी आचारसंहिता सुरू होताच कारवाईला गती देण्यात आली आहे. यासाठी पोलीस दलातर्फे विशेष मोहिम राबविण्यात आली आहे. याअंतर्गत आतार्पयत 189 जणांवर फौजदारी प्रक्रिया संहिता प्रमाणे प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यातील 166 जणांकडून चांगल्या वर्तवणुकीसाठी बॉण्ड घेण्यात आले आहेत. याशिवाय सहा अनधिकृत शस्त्र जप्त करण्यात आली असून त्यात एक पिस्टल, पाच धारदार शस्त्रे यांचा समावेश आहे. संबधीतांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत. तीन तडीपार आरोपींनी कायद्याचा भंग केल्याने त्यांना अटक करून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.एकुण 197 जणांना अजामिनपात्र वॉरंटची बजावणी करण्यात आली आहे. 2019 मध्ये आचार संहितेपुर्वी 95 व आचारसंहिता चालू झाल्यापासून आतार्पयत 20 पाहिजे असलेल्या आरोपींनाही अटक करण्यात आली आहे. यासाठी विशेष मोहिम देखील राबविण्यात येत असून पथकही स्थापन करण्यात आले आहे. परवानाधारक 272 जणांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. आचारसंहिता काळात आतार्पयत 50 दारूबंदीच्या केसेस करण्यात आल्या असून एकुण दहा लाख 95 हजार 391 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्याच्या सिमेलगत असलेल्या गुजरात व मध्यप्रदेश राज्यातून अवैध दारू, शस्त्रे यांची वाहतूक होणार नाही याकरीता तसेच फरार व पाहिजे असलेले आरोपी पकडणे कामी वरिष्ठ अधिकारी यांच्यात आपसात समन्वय होवून माहितीची देवाण-घेवाण आतार्पयत चार ठिकाणी बैठका झाल्या आहेत. त्यात मध्यप्रदेशातील अलीराजपूर, महाराष्ट्रातील नंदुरबार व पाल, गुजरातमधील वलसाड या ठिकाणांचा समावेश आहे. लगतच्या राज्य सिमेवरील 16 ठिकाणी चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. मध्यप्रदेशलगत पाच, गुजरातलगत 11 ठिकाणी ते कार्यरत राहणार असून आतार्पयत सहा ठिकाणी ते सुरू करण्यात आले असल्याची माहितीही पोलीस अधीक्षक संजय पाटील यांनी दिली.