शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

22 गावांचा पाणीटंचाईबाबत प्रस्ताव सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 12:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : तळोदा तालुक्यातील 22 गावांमधील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजनेसाठी साधारण 39 ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : तळोदा तालुक्यातील 22 गावांमधील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजनेसाठी साधारण 39 लाख 50 हजार रूपयांचा प्रस्ताव वरिष्ठ महसूल यंत्रणेकडे पाठविला असून, हा प्रस्ताव तातडीने मंजूर करण्याची मागणी गावक:यांनी केली आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधीत गावांसाठी देण्यात आलेल्या पेसाच्या निधीतूनच उपाययोजना करण्याची सूचना प्रशासनाने केली आहे.तळोदा तालुक्यात यंदा मान्सूनचे प्रमाण अत्यंत कमी झाले होते. अगदी सरासरीच्या निम्मेदेखील झाले नव्हते. परिणामी यंदा तालुक्यातील जनतेला दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. एवढेच नव्हे तर भूगर्भातील पाण्याची पातळीही दिवसागणिक खालावत चालल्यामुळे बहुतके गावांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. सध्या तालुक्यातील जवळपास 22 गावांनी आपल्या ग्रामपंचायतीमार्फत पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडे पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमिवर हातपंपाची मागणी केली आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांपासून तसे पपत्र भरून संबंधीतांकडे मागणी केली आहे. यात खरवड, गंगानगर, करडे, जुवानी (फॉरेस्ट), लाखापूर (फॉरेस्ट), लाखापूर (रेव्युनी), पाडळपूर, खर्डी (खुर्द), खर्डी (बुद्रूक), गायमुखी, रोझवा, रोझवा पुनर्वसन, भवर, राजविहीर, ढेकाटी, धवळी विहीर, नवागाव, सिलींगपूर, तुळाजा, पिंपरपाडा, ङिारी, चिनोदा, राजापूर, उमरकुवा या गावांचा समावेश आहे. संबंधीत विभागानेदेखील तत्काळ प्रस्ताव तयार करून पुढील कार्यवाहीसाठी स्थानिक महसूल प्रशासनाच्यामार्फत उपविभागीय कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. मात्र त्यावर अजूनही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे म्हटले जात आहे. वास्तविक या गावामधील पाणीटंचाईसाठी शासनाच्या भूजल सव्रेक्षण विभागानेदेखील सव्रे केल्याचे सांगितले जात आहे. तरीही हातपंपाबाबत प्रशासनाकडून उपाययोजना केली जात नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. बहुसंख्य गावातील हातपंप पाण्याअभावी व नादुरूस्तीमुळे तेथील नागरिकांना पाण्याकरीता भटकंती करावी लागत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.संबंधीत ग्रामपंचायती उपाययोजनेसाठी प्रशासनाकडून निधीची मागणी करते तर प्रशासन म्हणते पंचायतींनी शासनाकडून मिळालेल्या पेसाचा निधी खर्च करावा. या दोन्ही यंत्रणांच्या तू-तू, मै-मैमुळे नाहक ग्रामस्थांना पाणीटंचाईने होरपळून निघावे लागत असल्याची व्यथा गावक:यांनी बोलून दाखविली आहे. जिल्हा प्रशासनाने याप्रकरणी दखल घेण्याची मागणी गावक:यांनी केली आहे.ग्रामीण भागात पिण्याचे पाणीपुरवठा करणारे 400 हातपंप नादुरूस्त असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हे हातपंप गेल्या अनेक वर्षापासून निकामी ठरले आहेत. त्यामुळेदेखील ग्रामस्थांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वास्तविक हे हातपंप दुरूस्तीबाबत ग्रामपंचायतींनी संबंधीत यंत्रणेकडे पाठपुरावा केला होता. परंतु पथकांकडेच दुरूस्तीच्या साहित्याचा अभाव असल्यामुळे ते दुरूस्त होवू शकले नसल्याचे सांगितले जात आहे. सद्या तालुक्यात दुष्काळी स्थिती असल्याने पंचायत समितीचे दुरूस्ती पथक सुसज्ज ठेवणे आवश्यक आहे. परंतु तसे होत नसल्यामुळे एवढय़ा मोठय़ा संख्येने हातपंप नादुरूस्त असल्याची वस्तुस्थिती आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ प्रशासनानेही दोन अथवा तीन पथकांची नियुक्ती केली पाहिजे, अशी मागणीदेखील ग्रामीण जनतेमधून केली जात आहे. बहुतेक ठिकाणी तीन ते चार हातपंप नादुरूस्त आहेत. तेथे मुबलक पाणी असतांना केवळ नादुरूस्त झाल्यामुळे लोकांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तालुक्यातील पाणीटंचाईच्या पाश्र्वभूमीवर प्रस्ताव मंजुरीसाठी उपविभागीय अधिका:यांकडे पाठविला असला तरी या प्रशासनाने ज्या गावांचा प्रस्ताव आला आहे. तेथे आपल्या प्रमुख अधिका:यांमार्फत प्रत्यक्ष गावात जावून सव्रे करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार तहसीलदार योगेश चंद्रे व पाणीपुरवठा विभागाचे अभियंता राहुल गिरासे यांच्या सोबत तालुक्यातील धवळीविहीर गावास भेट देवून गावक:यांशी चर्चा केली होती. त्या वेळी तेथे तब्बल तीन हातपंप नादुरुस्त असल्याचे आढळून आले. तेथे पाणी असे तर नवीन हातपंप करायची गरज राहणार नाही. गरज भासली तर पेसाच्या निधीतून ग्रामपंचायतीने हातपंप करण्याची सूचनाही या वेळी प्रशासनाने दिली.