लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील विविध भागात पाडव्याच्या दिवशी मंदिरे खुली करण्यात आली. या मंदिरांमध्ये सकाळी सात पासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. शहरातील गणपती मंदिर, राम मंदिर, खोडाई माता मंदिर, दंडपाणेश्वर मंदिर, वाघेश्वरी देवी मंदीर, मोठा मारुती मंदिर यासह ठिकठिकाणी सकाळपासून उत्साह होता. शहरातील नागरीकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही यावेळी हजेरी लावत आरती पूजनात सहभाग घेतला. पाडव्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडणार असल्याने आकर्षक पद्धतीने फुलांची सजावट करण्यात आली होती. शहरातील गणपती मंदिरात भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका-यांच्या हस्ते आरती पूजन करण्यात आले. शहरात मंदिरे सुरू झाल्याने बंद असलेले पूजा साहित्य व इतर साहित्य विक्रेत्यांची दुकानेही खुली करण्यात आली. दिवसभरात नारळ, पूजन साहित्य तसेच फुलांची मोठी खरेदी करण्यात आली.
मंदिरांमध्ये भविकांची उपस्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 12:49 IST