लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आगामी विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने आणि शांततेत व्हाव्यात यासाठी आवश्यक सर्व तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ़ राजेंद्र भारुड यांनी महसूल अधिका:यांना केल्या़ बैठकीला अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, दत्तात्रय बोरुडे, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल पवार, उपजिल्हाधिकारी धनंजय निकम, सुधीर खांदे उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ़भारुड यांनी निवडणुकीशी संबंधित सर्व अधिका:यांनी मतदान केंद्रस्तरार्पयत निवडणूक आराखडा तयार करावा, मतदार जागृतीवर भर द्यावा, एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व प्रक्रिया होईल याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना केल्या़ पीएम किसान योजनेच्या यादीतील दुरुस्तीचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, प्रधानमंत्री किसान मानधन योजनेसाठी 18 ते 40 वयोगटातील शेतक:यांची संख्या निश्चित करावी, पिक विमा योजनेचा लाभ वेळेत संबंधितांना मिळावा याकरीता पिक कापणी प्रात्यक्षिकाच्या कामाला गती द्यावी तसेच प्रात्यक्षिकात विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी हजेरी देण्याच्या सूचना करण्यात आल्या़ जिल्ह्यातील अनाधिकृत गौण खनिज वाहतूक थांबविण्याच्यासाठी जिल्ह्यातील सर्व स्टोन क्रशरची माहिती एकत्रित करण्याचे आणि सातबारा संगणकीकरणाचे काम निवडणूक आचारसंहितेपूर्वी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिल़े
विधानसभा निवडणूकीची तयारी वेळेत पूर्ण करा : जिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 12:24 IST