शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात चार लाख झाडांच्या लागवडीची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:34 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : येत्या 1 जुलै रोजी राज्यात होणा:या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्याकडून योगदान देण्यात येणार आह़े यात सामाजिक वनीकरण विभागाकडून चार लाख झाडे तयार करण्याचे काम सुरू झाले असून यासाठी लागणारे खड्डे रोजगार हमी योजनेतून खोदण्यात येत आहेत़  जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात रस्ते आणि गटक्षेत्रात ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 27 : येत्या 1 जुलै रोजी राज्यात होणा:या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमात जिल्ह्याकडून योगदान देण्यात येणार आह़े यात सामाजिक वनीकरण विभागाकडून चार लाख झाडे तयार करण्याचे काम सुरू झाले असून यासाठी लागणारे खड्डे रोजगार हमी योजनेतून खोदण्यात येत आहेत़  जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यात रस्ते आणि गटक्षेत्रात रोपण करण्यात येणा:या रोपांची लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाच्या सात रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्यास वेग देण्यात आला आह़े या झाडांसाठी लागणारे खड्डे रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून तसेच वनीकरणच्या अंतर्गत योजनेतून होणार असल्याने मजूरांच्या रोजगाराचा प्रश्नही मार्गी लागणार आह़े विविध प्रजातीच्या या झाडांना यंदा विशिष्ट पद्धतीने तयार करण्यात आलेल्या गांडूळ खताची मात्रा देण्यात येणार आह़े यातून रासायनिक खतांचा खर्चही कमी होणार आह़े  सामाजिक वनीकरण विभागाकडून गटलागवड आणि रस्त्याच्या दुतर्फा झाडांचे रोपण करण्यात येणार आह़े सामाजिक वनीकरण विभागाच्या बंधारपाडा, टोकरतलाव ता़ नंदुरबार, आमलाड ता़ तळोदा, दूधखेडा ता़ शहादा, रंगावली ता़ नवापूर आणि गंगापूर ता़ अक्कलकुवा येथे रोपवाटिकांमध्ये ही झाडे तयार करण्यात येत आहेत़ यंदा दुर्गम भागातही झाडे वाढावीत यासाठी मांडवी ता़ धडगाव येथे रोपवाटिका तयार करण्यासाठी विभागाच्या अधिका:यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत़ नंदुरबार तालुक्यात विभागाकडून 1 लाख 35 हजार वृक्षांचे रोपण करण्यात येणार आह़े यात 10 किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा आणि पाच गट लागवड क्षेत्रात तब्बल 25 हेक्टर जमिनीवर झाडे रोवण्याचे नियोजन करण्यात आले आह़े याठिकाणी किमान पावणेदोन लाख रोपांची लागवड होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े निम, बदाम,करंज, पळस, वड आणि पिंपळासह इतर फळ आणि फुलझाडे लागवड करण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागाने कंबर कसली आह़े यासाठी नंदुरबार तालुक्यात दीड लाख खड्ड करण्याचे उद्दीष्टय़ ठेवण्यात आले आह़े जिल्ह्यात 200 किलोमीटर अंतरावरील रस्त्यांच्या दुतर्फा 1 लाख रोपांचे रोपण होणार आह़े यासाठी चांगल्या दर्जाच्या जाळ्या आणून त्या तेथे बसवून वृक्षांचे संगोपन होणार आह़े