शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनो हात धुवायला प्राधान्य द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2020 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील शाळांमध्ये दक्षता घेऊन विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार शहरातील शाळांमध्ये दक्षता घेऊन विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे़ यात प्रामुख्याने विद्यार्थ्यांना हात धुण्यासाठी प्रवृत्त करुन आजारी विद्यार्थ्यांना घरी राहण्याचे सल्ले दिले जात आहे़ कोरोनाचा प्रसार अद्याप राज्यात नसला तरी दक्षता म्हणून विद्यार्थ्यांना लक्षणांची माहिती शांळामध्ये दिली जात आहे़महाराष्ट्रात अद्याप कोरोना संसर्ग झालेले रुग्ण आढळून आलेले नसले तरी भिती कायम आहे़ यात प्रामुख्याने शालेय शिक्षण घेणाऱ्या पाल्यांचे पालक भेदरलेले असून शाळांनी उपाययोजना राबवली जावी अशी मागणी पालकांची आहे़ कोरोनाबद्दल असलेले समज आणि गैरसमज याचा आढावा घेण्यासाठी ‘लोकमत’ने शहरातील मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या १० शाळांमध्ये भेटी देऊन माहिती घेतली़ यात शाळांमध्ये उपाययोजना म्हणून हात धुण्याचे प्रशिक्षणच शिक्षक विद्यार्थ्यांना देत असल्याचे दिसून आले़ सध्या परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांची शाळांमधील उपस्थिती ही लक्षणीय असल्याचे दिसून आले़ आजारी विद्यार्थ्यांची संख्या ही नगण्य असल्याचे वर्गांमधील उपस्थितीतून जाणवले होते़ काही ठिकाणी शिक्षकांनी कोरोनाबद्दल विद्यार्थ्यांना विचारणा केल्यावर त्यांच्याकडून उपाययोजनांसदर्भात उत्तरे देण्यात आली़एकीकडे ही स्थिती असताना दुसरीकडे जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदेच्या शाळा, नंदुरबार आणि तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या आश्रमशाळा, नवोदय विद्यालय आणि आंतराष्ट्रीय शाळा येथेही योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्याची माहिती त्या-त्या शाळा प्रशासनांकडून देण्यात आली आहे़ इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालक आणि शिक्षक संघाची बैठक घेऊन विविध बाबींवर चर्चा करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे़

पालकांकडून कोरोनाबद्दल भिती व्यक्त करण्यात आल्यानंतर शाळांमध्ये जेवणाच्या सुट्यांमध्ये सॅनेटायझरचा वापर करुन हात धुण्याचे सक्तीचे केले गेले आहे़ सर्वच शाळांच्या स्वच्छतागृहात माहितीपत्रके लावली आहेत़ गरज असल्यावरच विद्यार्थ्यांनी मास्क लावण्याच्या सूचना असून घरी गेल्यावरही विद्यार्थी सूचनांचे पालन करत असल्याचे सांगण्यात आले आहे़ इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये किरकोळ आजारांची माहिती घेतली जात आहे़

शाळेमध्ये येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची संख्या ही नियमित आहे़ आजारपणामुळे एखाददुसरा विद्यार्थी गैरहजर असतो़ स्वच्छता गृह आणि जेवणाच्या सुटीत विद्यार्थ्यांना हात धुवून ते स्वच्छ पुसून घेत पुढील प्रक्रिया करण्यात येत आहे़ सध्या तरी कोणतीही भिती नाही़-नूतनवर्षा वळवी, प्राचार्या, एस़ए़मिशन,हायस्कूल, नंदुरबाऱ

विद्यार्थ्यांची संख्या चांगलीच आहे़ परीक्षांचे दिवस असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे़ सर्दी किंवा इतर आजारांचा त्रास जाणवणाऱ्या विद्यार्थ्यांना योग्य त्या उपाययोजनांबाबत सूचित केले जाते़ कोरोनाबाबत योग्य ती माहिती देण्यात येत आहे़ जनजागृतीवर भर असून पालकांनी घाबरुन जाण्याची गरजच नाही़-सुषमा शाह, प्राचार्या, हिग़ो़श्रॉफ हायस्कूल, नंदुरबाऱ

कोरोना व्हायरचा प्रसार हा प्रामुख्याने थंड प्रदेशात होतो़ यामुळे पालकांनी मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुटीत थंड प्रदेशात जाणे टाळले पाहिजे़ गर्दीच्या ठिकाणी मास्क लावावे तसेच सर्वांनीच हात धुण्याकडे लक्ष द्यावे़ किरकोळ लक्षणे जाणवल्यानंतर तातडीने वैद्यकीय तपासण्या करुन घ्याव्यात़-डॉ़ राजेश वळवी, अध्यक्ष, आयएमए, नंदुरबाऱ

शाळेमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती ही सामान्य आहे़ विद्यार्थ्यांना कोरोनाची माहिती मिळावी यासाठी प्रत्येक वर्गात माहिती पत्रकांचे वितरण केले आहे़ यात उपाययोजना आणि घ्यावयाची दक्षता याचा उल्लेख आहे़ यातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन झाले आहे़-मुकूंद इंगळे, प्रिन्सिपल, पोदार इंग्लिश मेडियम स्कूल, नंदुरबाऱ

नंदुरबार प्रकल्प कार्यालयातील ६४ शासकीय व अनुदानित आश्रमशाळांसह वसतीगृहांमध्ये विद्यार्थ्याना सूचना करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़ याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी हात धुण्याचे लिक्विड हँड वॉश पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती प्रकल्प कार्यालयाकडून दिली गेली आहे़