शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईयुक्त भागात जलयुक्तला प्राधान्य

By admin | Updated: February 23, 2017 00:39 IST

कार्यशाळा : गेल्या वर्षाच्या कामांचाही घेतला आढावा

नंदुरबार : ज्या गावांना पुढील काळात पाणी टंचाई जाणवेल, ज्या परिसरात भुगर्भातील पाणी पातळी खोल     गेली असेल अशा गावांना जलयुक्त अंतर्गत लाभ दिला गेला पाहिजे अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी यांनी जलयुक्तच्या तालुकास्तरीय आढावा बैठकीत दिल्या.जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय बैठक व कार्यशाळा रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी बोलत होते. जिल्हा परिषेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एम.मोहन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुभाष नागरे, तहसीलदार नितीन पाटील, पी.टी.बडगुजर, महेश पोतदार  आदी उपस्थित होते.सुरुवातीला गावनिहाय कामांचा आढावा घेण्यात आला. अपुर्ण असलेली कामे तातडीने पुर्ण करण्यासाठी सुचना देण्यात आल्या. यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी म्हणाले, यंदा काही भागात पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे अशा भागातील गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.  अनेक गावातील सरपंचांकडून     अनेक सुचना आल्या होत्या. त्यामुळे टंचाई कृती आराखडा तयार करतांना त्या बाबींचा,  सुचनांचा आढावा घेण्यास देखील सांगण्यात आले   होते. सर्वांनी वृक्ष संवर्धन, पाणी आडवा-पाणी जिरवा, जल पुनर्रभरण यासारखे प्रयोग राबविले तर परिसराचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही. ज्या ठिकाणी टंचाई आहे अशा ठिकाणी कुपनलिका न करता विहिरीच खोदली पाहिजेत असेही मत त्यांनी व्यक्त केले. शिवारफेरी गावातीलच लोकांनी आयोजित केली पाहिजे. ज्या गावांना पाणी टंचाई जाणवणार अशा गावांना आपण   स्वत: भेट देणार असून  उपाययोजनांचा आढावा देखील घेणार आहोत. सुरुवातीला तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांनी तालुक्यात निवडलेल्या गावांविषयी माहिती देत कामे, राबविण्यात येणारी यंत्रणा याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना माहिती दिली. प्रास्ताविक करणसिंग गिरासे यांनी केले.कार्यशाळेत जलयुक्त शिवार योजनेत निवडलेल्या गावांचे सरपंच, उपसरपंच, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक, तलाठी व तालुक्यातील विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.