शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

विश्वाच्या समृद्धीसाठी प्रभू येशूची प्रार्थना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नाताळनिमित्त शहरातील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये विश्व समृद्धीसाठी ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली़ यावेळी जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नाताळनिमित्त शहरातील सुवार्ता अलायन्स चर्चमध्ये विश्व समृद्धीसाठी ख्रिस्ती बांधवांकडून प्रार्थना करण्यात आली़ यावेळी जिल्ह्यातील विविध मान्यवरांनी येथे भेट देत नाताळच्या शुभेच्छा दिल्या़डॉ़ राजेश जेमा वळवी यांच्या अध्यक्षतेखाली चर्चमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते़ प्रारंभी रेव्हरंड अनुपकुमार वळवी यांनी नाताळ आणि प्रभू येशूच्या जीवनावर प्रवचन दिले़ प्रसंगी रेव्हरंड जे़एच़पठारे, रेव्हरंड व्ही़एम़पाटील, रेव्हरंड ग्लॅडविन जयकर, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक, सागर कालू, आकाश पाडवी, प्रेमानंद लवणे, मार्था सुतार, नूतनवर्षा वळवी, स्रेहलता कालू, पौलस वाघमारे, राजेंद्र व्यास, विश्वास पाडवी, सत्यजित नाईक, सॅबस्टीन जयकर, डॉ़ राजेश वळवी उपस्थित होते़सकाळी प्रार्थनेनंतर चर्चच्या आवरात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले़ यात परिसरासह शहरातील विविध भागात राहणारे ख्रिस्ती बांधव सहभागी झाले होते़ नाताळच्या पार्श्वभूमीवर चर्चसह परिसरात करण्यात आलेली सजावट लक्ष वेधून घेत होती़ नाताळच्या पार्श्वभूमीवर येथे धार्मिक गीत गायनाचा कार्यक्रम झाला़खासदार डॉ़ हीना गावीत, आमदार डॉ़ विजयकुमार गावीत यांनी याठिकाणी भेट देत ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या होत्या़ त्यांच्यासह जिल्ह्यातील विविध मान्यवरांनीही सुवार्ता अलायन्स चर्चला भेट दिली होती़ईसाईनगर ता.नंदुरबारनाताळनिमित्त बाहेरगावी गेलेले ईसाईनगर ता.नंदुरबार येथील ख्रिस्ती बांधव परतले आहे. नववर्ष व नाताळ साजरा करण्यात आला. यावेळी रेव्ह. लाजरस वळवी यांची प्रमुख उपस्थिती होती. ईसाईनगरात नाताळनिमित्त घरांची डागडुगी, रंगकाम, स्वच्छतेसाठी बैठका घेण्यात येत आहे. नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेले कुटुंब आपल्या मूळगावी परतले आहे. त्यामुळे त्यांना एकत्रित सण साजरा करता येत आहे. रेव्ह. लाजरस वळवी यांनी मार्गदर्शन करीत व्यसन, दुराचार व कोणतेही भेदभाव न पाळता येशुंच्या दाखवलेल्या मार्गावर चालण्याचे आवाहन केले.पोदार स्कूल, नंदुरबारपोदार स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्राचार्य मुकुंद इंगळे, उपप्राचार्य गोविंद गांगुर्डे, कार्यक्रम समन्वयक नागेश लोहार आदी उपस्थित होते. दरम्यान विद्यार्थ्यांनी रंगबिरंगी वस्त्रे परिधान करीत नृत्य सादर केले. प्राचार्य मुकुंद इंगळे यांनी मार्गदर्शन केले. यानिमित्त पालकांसाठी आर्ट मेला अंतर्गत चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुई पाटील व ध्वनी गुजराथी या विद्यार्थिनींनी केले.मिशन स्कुल, ईसाईनगरईसाईनरगर ता. नंदुरबार येथील खाजगी मिशन शाळेत नाताळनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषा केली. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. यावेळी रेव्ह.संतोष गावीत, राकेश गावीत, यशवंत गावीत, वसंत वळवी, भानुदास गोसावी आदी उपस्थित होते. स्पर्धांमध्ये फनी गेम्स, लंगडी, कबड्डी, संगित खुर्ची या स्पर्धांचा समावेश होता. सूत्रसंचालन भटू पवार यांनी केले तर आभार शेकनाथ पाटील यांनी मानले. कार्यक्रमासाठी रेखा भदाणे, स्वप्नील वसावे यांनी परिश्रम घेतले.विद्या इंग्लिश स्कूल, पथराईपथराई ता. नंदुरबार येथील विद्या इंग्लिश स्कुलमध्ये नाताळनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषा केली. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. यावेळी शितल पाटील, अर्चना पाटील यांच्यासह सर्वर् कर्मचारी उपस्थित होते.सुवार्ता अलायन्स चर्चसामाजिक बांधिलकी जपत नंदुरबार येथील सुवार्ता अलायन्स चर्चमार्फत २५ रोजी मुकबधिर विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यात नंदुरबार शहराजवळील गुरुकुल नगर, दुधाळे शिवार व धामडोद ता. नंदुरबार येथे मुकबधिर विद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम झाले.चौपाळे ता. नंदुरबार येथील पी.जी. पब्लिक स्कुलमध्ये नाताळनिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यात विद्यार्थ्यांनी सांताक्लॉजच्या विविध वेशभूषा केली. दरम्यान सांस्कृतिक कार्यक्रमही घेण्यात आले. यावेळी संस्थाध्यक्ष पुष्पेंद्र रघुवंशी, अ‍ॅड. रुद्रप्रताप रघुवंशी, मुख्याध्यापिका बिंदू श्रीवास्तव यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.यंदा नाताळच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विविध कार्यक्रमांना प्रमुख अतिथी म्हणून स्वीडनच्या रहिवासी कारीन ओल्सन व इंगरींद ओल्सन या दोघी बहिणीं उपस्थित होत्या़ एस़ए़मिशन इंग्लिश मेडियम स्कूलची स्थापना करणाºया ओल्सन साहेब यांच्या कन्या असलेल्या ओल्सन भगिनी येथील पाहुणचाराने भारावल्या होत्या़ पिढ्यांपासून भारतासोबत असलेल्या ऋणानुबंधांना उजाळा दोघींनी यावेळी दिला़