शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

प्रतापपूरात पिके करपू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 11:39 IST

प्रतापपूर परिसर : सोयाबीन, कापूस, पपई पिकांना फटका, पाण्याची पातळी खालावली

प्रतापपूर : तळोदा तालुक्यातील प्रतापपूरसह लगतच्या परिसरात कमी पजर्न्यमान व परतीच्या पावसानेही निराशा केल्याने  सोयाबीन, कापूस, मका, ज्वारी, तूर, उडिद आदी पिकांच्या उत्पादनात मोठय़ा प्रमाणात घट होण्याची शक्यता आह़े बोअरवेलच्या पाण्याची पातळी  खालावली आह़े त्यामुळे पिकाला लागलेला खर्चही काढणे कठीण झाले आह़ेया वर्षी सरासरीपेक्षा अत्यंत कमी पावसाची नोंद झाली आह़े याचा फटका पिकांना बसताना दिसून येत आह़े सोयाबीन पिक ऐन बहरात असताना पाऊस न झाल्याने या पिकाचे नुकसान झाले आह़े परिणामी उत्पन्नात घट झालेली आह़े पिकांवरील खर्च काढणेही शक्य होत नसल्याचे उत्पादक शेतक:यांकडून सांगण्यात येत आह़े तसेच सप्टेंबर महिन्यात पाऊस नसल्याने कापूस पिकाला बोंडअळीमुळे नुकसान सहन करावे लागले आह़े पिकांची पाने लाल पडत असून यामुळे कापसाचा दर्जा खालावत आह़े या परिसरात सोयाबीन व कापूस हे पिक मोठय़ा प्रमाणात घेतले जात़े ज्वारी, उडीद, तुर या कोरडवाहू पिकांनाही पाणीटंचाईचा फटका बसत आह़ेप्रतापपूर परिसर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असून या भागात पाण्याची पातळी गेल्या अनेक वर्षापासून तग धरुन होती़ मात्र या वर्षी अत्यंत कमी पाऊस झाल्याने पावसाळा संपला तरीदेखील पाणी लागले नाही़ त्यात, भाद्रपद महिन्यात तापमानाचा पारा वाढल्याने  पिकांचे अधिकच नुकसान होत आह़े आधीच पाण्याची कमतरता त्यात, तापमान यामुळे पिके करपू लागली आहेत़ पाण्याची पातळी दिवसेंदिवस घटत असून शेतकरी ऊस व केळी पिके वाचविण्यासाठी कसरत करीत आहेत़ बारमाही पिकांवर  महागडी रसायने, खते, किटकनाशक, ठिबक सिंचन आदींचा खर्च करावा लागत असतो़ त्यामुळे निदान तेवढा खर्चही निघाला तरी बरे होईल अशी अपेक्षा शेतक:यांकडून व्यक्त केली जात आह़े दरम्यान, केळी पिकाला जास्त पाणी लागत असत़े या भागात कांदे बाग प्रकारात केळीची लागवड केली जात़े हे पिक उन्हाळ्यात एप्रिल व मे महिन्याच्या अखेरीस निघेल, मात्र तोर्पयत बोअरवेल चालणे अवघड असल्याने शेतकरी पाण्याच्या विवंचनेत आहेत़ प्रतापपूर परिसर सातपुडय़ाच्या पायथ्याशी असल्याने या भागात पर्वत रांगेत गुरांना मुबलक प्रमाणात चारा मिळतो़ मात्र या वर्षी कमी पावसामुळे गवत करपू लागले आहेत़ त्यामुळे चा:याचाही तुटवडा जाणवत आह़े तसेच चा:याचे पिक म्हणून ओळखल्या जाणा:या ज्वारी, मका या पिकांच्या उत्पादनात मोठया प्रमाणात घट आल्याने पशुपालकांना चा:याचा प्रश्न सतावत आह़े  परिसरात पशुपालकांकडे बैल, गाई, म्हशी, शेळ्या मोठय़ा प्रमाणात असून त्यामानाने चा:याचे पिके कमी असल्याने चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आह़े परिसरात खरिपाच्या पिकांना कमी पजर्न्यमानामुळे फटका  बसत आह़े यातून उत्पन्नात घट होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आह़े त्यामुळे शासनाने त्वरीत दुष्काळ जाहीर करावा अशी  अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े