शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

प्रकाशा तीर्थक्षेत्र सुने सुनेच...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:32 IST

सविस्तर वृत्त असे की, २३ मार्च २०२० रोजी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रकाशा येथील धार्मिक मंदिरे व धार्मिक उत्सवांना ...

सविस्तर वृत्त असे की, २३ मार्च २०२० रोजी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर प्रकाशा येथील धार्मिक मंदिरे व धार्मिक उत्सवांना बंदीचा ठराव ग्रामपंचायतीने केला होता. त्यानंतर गावातील केदारेश्वर, काशी विश्वेश्वर, पुष्पदंतेश्वर, संगमेश्वर, गौतमेश्वर, मुक्तेश्वर आदींसह सर्वच मंदिराचे द्वार बंद झाले. इतिहासात आजपर्यंत ही मंदिरे कधीच बंद झाली नव्हती. मात्र कोरोनामुळे व शासनाच्या आदेशान्वये सर्वच मंदिरे बंद झाली होती. त्यानंतर मात्र कोरोना वाढतच गेल्याने ही स्थिती पुढे काही दिवस कायम राहिली.

९ जून रोजी शिथिलता मिळाल्यानंतर मंदिरावर स्वयंचलित सॅनिटायझर मशीन बसविल्यानंतर तुरळक भाविक दर्शनासाठी येऊ लागले. मात्र इतर गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने गावात रेड झोनमधून येणाऱ्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनाही जून महिन्यामध्ये बंदी करण्यात आली होती. विशेष म्हणजे जुलै महिन्यात श्रावण मास होता. २२ जुलैपासून हिंदू धर्मीयांचा पवित्र महिना म्हणजे श्रावण मास सुरू झाला होता. श्रावण महिन्यात पूजा-अर्चा अभिषेक आदींसाठी महाराष्ट्रासह गुजरात व मध्य प्रदेशातून भाविक केदारेश्वरसह इतर मंदिरांवर येतात. मात्र गेल्यावर्षी कोरोनामुळे श्रावण महिन्यात शांतता राहिली. एकही भाविक त्याठिकाणी आढळून आला नाही. शिवाय शाळाही बंद असल्याने विद्यार्थीदेखील घरीच दूरचित्रवाहिनीवर टीली-मिली हा कार्यक्रम पाहून अभ्यास करीत होते.

२७ जुलै रोजी प्रकाशा ग्रामपंचायतीने २९ जुलै रोजी दशामाता मूूर्ती विसर्जनासाठी परिसरातील भाविकांनी येऊ नये, असा ठराव केला करुन २८ जुलैला रात्रीपासून २९ जुलैच्या सकाळपर्यंत पोलिसांचा चोख बंदोबस्त प्रकाशा येथील तापी घाटावर ठेवला होता. दशामाता मूर्ती विसर्जनासाठी प्रकाशा तापी घाटावर यात्रा भरते. रात्रीचे नऊ तर पहाटे चार वाजेपर्यंत हजारो भाविक दशामाता मूर्ती विसर्जनासाठी येतात. मात्र गाव लॉकडाऊन होते म्हणून भाविकही येथे मूर्ती विसर्जनासाठी आले नाहीत.