कै. विश्रामकाका पाटील शैक्षणिक संकुलाच्या आवारात झालेल्या विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सत्कार समारंभास महाविद्यालयाचे प्राचार्य आय.डी. पाटील, उपप्राचार्य एस.जे. पटेल, उपमुख्याध्यापक एस.डी. भोई, पर्यवेक्षिका यू.एस. खैरनार व गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. दहावीच्या परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला असून प्रथम भावना अनिल वसावे (९७.०३ टक्के), द्वितीय क्रमांक ईश्वर पाटील (९७.०७ टक्के) याने पटकावला. शाळेचा बारावीचा निकालही १०० टक्के लागला असून यात महाविद्यालयात प्रथम व द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यात विज्ञान शाखेत तेजस नेत्रदीपक कुवर यास (९६.३३ टक्के) प्रथम व नंदुरबारे तेजस विजय (९६ टक्के) द्वितीय, कला शाखेत प्रीती विजय अहिरे (८२.८३ टक्के) प्रथम व दिव्यानी युवराज सूर्यवंशी (८२ टक्के) द्वितीय तर वाणिज्य शाखेत भूमिका राजेंद्र संगारे (९२.६६ टक्के) प्रथम व मेघा नरेंद्र प्रजापती (९२.०५ टक्के) द्वितीय, तसेच किमान कौशल्य विभागातून विशाल मधुकर (८४.६७ टक्के) प्रथम व आकाश रवींद्र पावरा व गौरव भिला माळी या दोघा विद्यार्थ्यांना समान गुण (७९.५० टक्के) मिळाल्याने त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला. गुणवंत झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना संस्थेचे चेअरमन मोतीलाल पाटील यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, शिल्ड व विद्यालयाची बॅग भेट देण्यात आली. शेठ व्ही.के. शहा माध्यमिक विद्यालयातून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये घेण्यात आलेल्या राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षेत समर्थ प्रदीप क्षीरसागर व रायसिंग साकऱ्या पाडवी हे दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून विद्यार्थ्यांना वार्षिक १० हजार रुपये शिष्यवृत्ती राज्य शासनाकडून देण्यात येणार आहे. त्यांचाही गौरव यावेळी करण्यात आला.
यावेळी मोतीलाल पाटील म्हणाले की, कोरोनामुळे अनेक दिवसांपासून शाळेशी, महाविद्यालयाशी विद्यार्थ्यांचा संपर्क तुटला होता. याच काळात ऑनलाइन अभ्यासक्रमातून शिक्षणात सातत्य ठेवले. गेल्या दीड-दोन वर्षात काय झाले काय नाही झाले हे विसरून विद्यार्थ्यांनी आता पुन्हा क्षितिजापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावा. संस्थेचे अनेक गुणवंत विद्यार्थी हे राज्याच्या बाहेर तसेच परदेशात उच्च शिक्षणासाठी पोहोचले आहे. त्यांचा आदर्श घ्यावा, असे सांगितले. सूत्रसंचालन प्रा. एस. एस. पाटील यांनी केले.