तळोदा : तळोदा येथे वीज ग्राहकांना अवाच्या सव्वा वीज बिल देण्यात येत असल्याने भिल्लीस्थान टायगर सेना व वीज ग्राहकांतर्फे महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता़ सहाय्यक अभियंता सचिन काळे, इम्रान पिंजारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आल़े अक्कलकुवा रस्त्यावरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली होती़ तळोदा येथे वीज मिटरचे रिडींग न घेता सरसकट अवाच्या सव्वा वीज बिल पाठविण्यात येत आह़े वीज बिल न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची धमकी महावितरणकडून देण्यात येत असल्याचा आरोप वीज ग्राहकांकडून करण्यात येत आह़े परिसरातील गरिब रहिवासी ऐवढे वीज बिल भरु शकत नसल्याने त्यांची चांगलीच पंचाईत होत असत़े भिल्लीस्थान टायगर सेनेचे तळोदा तालुकाध्यक्ष राजन पाडवी यांच्यासह अनेक वीज ग्राहक या वेळी मोर्चात सहभागी झाले होत़े यावेळी महावितरणच्या अधिका:यांसमोर तळोदा येथील रामगड भागातील वीज ग्राहकांची समस्या मांडण्यात आली़ या वेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, येथील रामगड परिसरातील गोरगरीब आदिवासी वीज ग्राहकांना रिडींग न घेताच वीज बिल देण्यात येत असत़े भरमसाठ वीज बिलामुळे त्यांना आर्थिक भरुदड सहन करावा लागत असतो़ वीज बिल भरले नाही तर महावितरणकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याचाही आरोप आह़ेवीजपुरवठा सुरळीत व्हावा, 16 तास वीज मिळावी, वीज ग्राहकांना विम्याचे संरक्षण मिळावे, वीज बिल रिडींग घेऊनच देण्यात यावी अशी मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली़ या वेळी सहाय्यक अभियंता सचिन काळे, अभियंता इम्रान पिंजारी यांनी निवेदन स्विकारुन आंदोलकांशी चर्चा केली़ तसेच मागण्या वरिष्ठ कार्यालयात पाठवून पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल़ेया वेळी राजन पाडवी, फौजदार यादव भदाणे, चंद्रकांत शिंदे यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी उपस्थित होत़े
जादा वीज बिलामुळे तळोदा महावितरण कार्यालयावर वीज ग्राहकांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 12:19 IST