शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अतिदुर्गम भागातील द:याखो:यात उतरुन पाण्यासाठी करावी लागतेय कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 12:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : सातपुडय़ाच्या अतिदुर्गम द:याखो:याचा भाग असलेल्या अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर ग्रामपंचायत अंतर्गत केवडीचा पाताईपाडा, कुईसापाडा अरेढी कुबाईपाडा, बोरविहीपाडा, पाटीलपाडा या पाडय़ांवर महिनाभरापासून पाण्याची पातळी खाली गेल्याने हातपंप बंद पडले आहेत. त्यामुळे येथील नागरिकांना दीड-दोन किलोमीटर भटकंती करीत झ:यातून पाणी गाळून पिण्यासाठी आणावे लागत आहे.केवडीचा कुईसापाडा येथील ग्रामस्थ भटकंती करीत एक किलोमीटर अंतरावरील नाल्याच्या झ:यात तासन्तास थांबून हंडाभर पाणी गोळा झाल्यावर पाणी गाळून पिण्यासाठी आणतात. अरेढीचा बोरविहीपाडा येथे एक हातपंप असून महिनाभरापासून तो बंद असल्याने दोन किलोमीटर अंतरावरून केवडी अरेढी गावाच्या मध्यठिकाणी असलेल्या नाल्यातून पाणी आणावे लागत आहे. अरेढी येथे चार हातपंप असून एप्रिल महिन्यापासून हातपंप आटल्याने दीड किलोमीटर अंतरावरून भटकंती करीत चढउतारच्या दरीत खाली उतरून तयार केलेल्या नाल्यातून पिण्यासाठी पाणी आणावे लागत आहे. पाटीलपाडा येथे दोन हातपंपाची पाण्याची पातळी एक महिन्यापासून खाली गेल्याने पाण्यासाठी एक किलोमीटर अंतरावर असलेल्या दरीत एका नाल्यातून पाणी आणावे लागते. मात्र याठिकाणी पाणी कमी असल्याने या पाडय़ांवरील नागरिकांना दोन किलोमीटर अंतरावर खोगदी नाल्यातील विहीरीवर गुराढोरांना पाणी पाजण्यासाठी तसेच स्वत: आंघोळीसाठी जावे लागत आहे. कुकडीपादरच्या तुरईपाडा येथे दोन्ही हातपंप आटल्याने तीन किलोमीटर अंतरावरून बारीपाडा येथील झ:यातून पाणी आणून तेथेच गुराढोरानांही पाणी पिण्यासाठी आणावे लागते.अक्कलकुवा तालुक्यातील कुकडीपादर व त्याअंतर्गत येणारे पाडे हे अतिदुर्गम भागात आहेत. या पाडय़ांवर पाणीपुरवठय़ासाठी असलेले हातपंप पाणी पातळी खोल गेल्याने महिनाभरापासून बंद पडले आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांना नदी-नाल्यात ङिारे तयार करून पाणी मिळवावे लागत आहे. त्यासाठी एक ते तीन किलोमीटरची पायपीट करावी लागते. हा भाग डोंगराळ असल्याने रस्ते नाहीत. परिणामी द:याखो:यात उतरुन चढउताराच्या रस्त्यावरून कसरत करीत पाणी आणावे लागते. तसेच आंघोळही याचठिकाणी करावी लागते. इतक्या लांबवरुन पाणी आणून गुराढोरांना पाणी पाजणे शक्य नसल्याने सोबत पाळीव जनावरांनाही पाणी पाजण्यासाठी न्यावे लागते.