शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

कार्यालयीन गृपवर झाली अश्लिल चित्रफित व्हायरल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कार्यालयीन कामकाजाच्या  व्हॅाट्‌सअप गृपवर तीन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने टाकलेल्या पावणे दोन मिनिटांच्या अश्लिल  चित्रफितीची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कार्यालयीन कामकाजाच्या  व्हॅाट्‌सअप गृपवर तीन दिवसांपूर्वी एका अधिकाऱ्याने टाकलेल्या पावणे दोन मिनिटांच्या अश्लिल  चित्रफितीची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चघळली जात आहे. या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊन त्याला जामीनही मिळाला आहे. अनवधानाने हा प्रकार घडल्याचे संबधीत कर्मचाऱ्याचे म्हणणेआहे.नंदुरबार आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा व्हॅाट्‌सअप गृप आहे. त्यावर कार्यालयीन कामाकाजाविषयी सुचना, आदेश तसेच इतर माहिती शेअर केली जाते. या गृपमध्ये एकुण ५३ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यात सहा महिला अधिकारी व कर्मचारी देखील आहेत.  या गृपवर सोमवारी रात्री सहायक नियोजन अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याने एक पावणे दोन मिनिटांची अश्लिल चित्रफित व्हायरल केली. चित्रफित टाकल्यानंतर संबधीताला त्याचे भान राहिले नाही. तोपर्यत अनेकांची ती चित्रफित आपल्या नजरेखालून घातली देखील. काहींनी संबधीताला फोन करून ती डीलेट करण्याचे सांगितले. तोपर्यत उशीर झाला होता. यामुळे मात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. मंगळवारी या बाबीची चर्चा जोरात राहिली, त्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे ठरविण्यात आले. प्रकल्प कार्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली. महिला अधिकाऱ्यांना लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी तसेच समाज माध्यम विषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवून घेण्यात आला. तपास अधिकारी पोलिस निरीक्षक कळमकर यांनी संबधीताला ताब्यात घेत न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसांची कोठडी सुनावली, नंतर त्यांचा जामीन झाला. रात्री नशेत अनवधनाने हे कृत्य झाल्याचे त्यांचे म्हणने असल्याचे पोलीसांचे म्हणने आहे. दरम्यान, या प्रकाराचे चर्वीतचर्वण शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे.