शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
2
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
3
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
4
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
5
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
6
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
9
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
10
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
11
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
12
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
13
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
14
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
16
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
17
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
18
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
19
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
20
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!

लोकसंख्या दिनी जिल्ह्यात जन्माला आले 275 बालके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2019 11:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लोकसंख्येच्या घनतेत खालच्या स्थानावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लोकसंख्या दिनी 275 बालकांनी जन्म घेतला़ दर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लोकसंख्येच्या घनतेत खालच्या स्थानावर असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात लोकसंख्या दिनी 275 बालकांनी जन्म घेतला़ दर चौरस किलोमीटरला 277 नागरिकांचा जिल्ह्यात रहिवास असून गत दोन वर्षात जन्मदर वाढवत अर्भकांचा मृत्यूदर कमी करण्याचा प्रयत्न सातत्याने केले गेल्याने जिल्ह्यात दरदिवशी किमान 300 मातांची यशस्वी प्रसूती होत आह़े     जिल्ह्यात 2017 अखेरीस 2 लाख 64 हजार 993 प्रजननक्षम जोडपी असल्याचे सव्रेक्षण आरोग्य विभागाने केले होत़े त्यांच्या संख्येत 2019 र्पयत वाढ झाल्याने जिल्ह्याच्या जन्मदरात वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आह़े आजअखेरीस 16 लाख 48 हजार 295 लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात अर्भक मृत्यूही सर्वाधिक चिंतनिय बाब होती़ 2017-18 या वर्षात जिल्ह्यात 0 ते 1 महिन्याच्या 563 अर्भकांचा मृत्यू झाल्याची माहिती आह़े यात ग्रामीण भागातील 226 तर शहरी भागातील 337 अर्भकांचा समावेश आह़े शहरी भागातील रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रसूतीदरम्यान अर्भकांचा मृत्यू झाल्याने त्यांची येथे नोंद झाली आह़े यामुळे जिल्ह्यात गर्भवती मातांसाठी ब:यापैकी सुविधा उपलब्ध करुन त्यांच्या प्रकृतीचा सातत्याने आढावा घेऊन सुरक्षित प्रसूती करण्यावर भर दिला गेला होता़  यातून गतदोन वर्षात जिल्ह्यात किमान 48 हजार माता सुखरुप प्रसूती झाल्याची माहिती आह़े  महिन्याला किमान 2 हजार 500 नवजात बालके जन्माला येत असल्याची सदस्यस्थिती आह़े ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य या 14 ठिकाणी मातांसाठी प्रसूतीकक्ष आहेत़ या कक्षांचा दर्जा गेल्या काही वर्षात वाढवला गेल्याने नंदुरबारसह शेजारील राज्यातील माताही येथे प्रसूतीसाठी येत आहेत़ जिल्ह्यात दर दिवशी 15 माता दाखल होत आहेत़ 

गुरुवारी जागतिक लोकसंख्या दिनी नंदुरबार जिल्हा सामान्य रुग्णालयात 15 मातांची प्रसूती झाली़ तसेच इतर 13 रुग्णालयांमध्ये 260 मातांनी अर्भकांना जन्म दिल्याच्या नोंदी करण्यात आल्या आहेत़ जिल्ह्यात जानेवारी ते जून या सहा महिन्याच्या कालखंडात 12 हजार 525 अर्भकांचा जन्म झाला आह़े यात अक्कलकुवा 2 हजार 99, धडगाव 2 हजार 433, नंदुरबार 3 हजार 670, नवापुर 1 हजार 130, शहादा 2 हजार 257 तर तळोदा तालुक्यातील रुग्णालयांमध्ये 936 बालकांचा जन्म झाला होता़ यातील एकही बालक दगावलेले नसल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आह़े जिल्ह्यात किमान 36 हजार 991 महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी करण्यात आल्याची माहिती आह़े यातील 21 हजारपेक्षा अधिक माता प्रसूत होणार असल्याचे सांगण्यात आले आह़े जिल्ह्यात गत दोन वर्षात सरासरी 253 अर्भकांचा जन्मानंतर मृत्यू झाल्याची आकडेवारी समोर आली आह़े

जिल्ह्यातील14 प्रसूतीकक्षात मातांची संख्या वाढत असल्याने खाटा अपु:या पडत आहेत़ यामुळे नंदुरबार येथील 100 खाटांचे तसेच धडगाव येथील 50 खाटांचे महिला रुग्णालय अंतिम टप्प्यात आह़े यासोबत अक्कलकुवा येथेही स्वतंत्र कक्षाची निर्मिती होणार असल्याने किमान 200 खाटा वाढून मातांची सोय होणार आह़े