शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतागृहांच्या बांधकामाची उदघाटनपूर्वीच झाली दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2018 12:52 IST

धडगाव : नगरपंचायतीच्या निधीतून मंजूर केलेल्या स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी दुरवस्था झाली आह़े यातील बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाची प्रचंड दुर्दशा ...

धडगाव : नगरपंचायतीच्या निधीतून मंजूर केलेल्या स्वच्छतागृहांचे बांधकाम पूर्ण होण्यापूर्वी दुरवस्था झाली आह़े यातील बसस्थानक परिसरातील स्वच्छतागृहाची प्रचंड दुर्दशा झाली असून ठेकेदाराने बांधकाम पूर्ण न करताच त्याचा वापर करण्याची मुभा दिल्याने हा प्रकार उद्भवला आह़े शहरात तीन ठिकाणी स्वच्छतागृह उभारणीला नगरपंचायतीने मंजूरी दिली होती़ यासाठी प्रत्येकी 22 लाख रूपयांचा खर्चही मंजूर केला आह़े धडगाव, रोषमाळ बुद्रुक आणि वडफळ्या या तीन ग्रामपंचायतींचे एकत्रीकरण करत धडगाव येथे नगरपंचायतीची निर्मिती करण्यात आली आह़े यानंतर गेल्या दोन वर्षापासून विविध विकास कामांना मंजूरी देण्याचा धडका पदाधिकारी आणि प्रशासन यांनी लावला आह़े यातच बसस्टँट परिसर, कन्या शाळा परिसर आणि तळोदा रोड भागात नागरिकांच्या सोयीसाठी स्वच्छतागृहांच्या कामांना मंजूरी देण्यात आली होती़ प्रत्येक बांधकामासाठी 22 लाख 58 हजार रुपयांप्रमाणे 67 लाख 76 हजार रुपयांच्या निधीला मंजूरी देऊन ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती़ गेल्या वर्षापासून या कामाला सुरुवात करण्यात आली होती़ यात बसस्थानकातील बांधकाम हे अंतिम टप्प्यात पोहोचून रंगरंगोटीही करण्यात आली होती़ यानंतर उद्घाटनाची प्रतिक्षा असतानाच देखरेखीअभावी या स्वच्छतागृहाचा वापर सुरु करण्यात आला़ परिणामी जागोजागी तूटफूट होऊन ड्रेनेजचे काम पूर्ण नसल्याने दुर्दशा झाली़ याबाबत ग्रामस्थांकडून विचारणा करण्यात आल्यावर नगरपंचायत प्रशासनाने ठेकेदाराकडे बोट दाखवत बिल रोखून धरल्याची माहिती दिली आह़े परंतू स्वच्छतागृहाच्या बांधकामास सुरुवात केली नाही़ इतर दोघी स्वच्छतागृहांची हीच स्थिती कायम आह़े बसस्थानक परिसरात यापूर्वी असलेले स्वच्छतागृह वर्षभरापूर्वी तोडल्यानंतर त्याजागी नवीन स्वच्छतागृह उभारण्याची मागणी होती़ स्वच्छतागृहच नसल्याने महिलांचे मोठे हाल होत होत़े नवीन बांधकाम केल्यानंतर नागरिकांची सोय झाली अशी अपेक्षा होत असतानाच त्याची अल्पावधीतच दुरवस्था झाल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े निर्माण झालेल्या या समस्येबाबत शहरात चर्चा रंगत असताना नगरपंचायतीचे पदाधिकारी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास तयार नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आह़े पदाधिका:यांनी लक्ष घालून तिन्ही स्वच्छतागृहांची कामे तात्काळ पूर्ण करण्याची मागणी होत आह़े