शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनच्या धरतीवरून जगाला दिसणार 'पॉवर'; २० मित्र ट्रम्प यांचा खेळ बिघडवणार, खरा डाव चौघे टाकणार
2
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
3
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
4
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
5
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
6
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
7
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण
8
बुलढाणा: बापाच्या छातीवर ठेवला पाय, गळा दाबला आणि पाजलं विष; मुलाकडून क्रूरतेचा कळस
9
पावसाचा तडाखा! खवळलेल्या व्यास नदीने प्राचीन पंजवक्त्र महादेव मंदिराला घेतलं कवेत; व्हिडीओ बघून अंगावर येईल काटा
10
"हनुमान चालीसा म्हण", अरबाज निक्कीला देतो सल्ला, गणपती बाप्पाच्या डेकोरेशनसाठीही करतोय मदत
11
Asia Cup 2025 : गोड बोलून संघाबाहेर काढलं? भारतीय क्रिकेटरची कोच गंभीरसंदर्भात 'मन की बात'
12
Nikki Bhati Case : निक्कीच्या नवऱ्याची होती गर्लफ्रेंड, तिच्याशी लग्न करणारच होता पण...; तेव्हाही केलेलं मोठं कांड!
13
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
14
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
15
गुरुवारी गजानन महाराज स्मरण दिन २०२५: एका दिवसांत कसे कराल ‘श्री गजानन विजय’ ग्रंथ पारायण?
16
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
17
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
18
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
19
दही की ताक... आरोग्यासाठी सर्वात बेस्ट काय? फायदे समजल्यावर व्हाल चकित
20
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!

93 पैकी केवळ आठच ग्रामपंचायतींसाठी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 12:09 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 63 ग्रामपंचायतींच्या 91 सदस्य आणि 2 लोकनियु्क्त सरपंच पदासाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहिर केला होता़ यांतर्गत सोमवारी माघारीच्या अंतिम मुदतीत 46 सदस्य आणि एका जागी लोकनियुक्त सरपंच बिनविरोध निवडून आल़े उर्वरित 46 पैकी 37 ठिकाणी निवडणूक रद्द तर आठ ठिकाणी 23 जून रोजी मतदान होणार आह़े      31 मे पासून सुरु झालेल्या निवडणूक प्रक्रियेंतर्गत उमेदवारांकडून 78 अर्ज दाखल करण्यात आले होत़े यात 69 अर्ज हे सदस्य तर आठ अर्ज हे अक्कलकुवा येथील लोकनियुक्त सरपंच पदासाठी होत़े 91 सदस्य  निवड प्रक्रियेसाठी अंतिम मुदतीत केवळ 69 अर्ज आल्याने 22 ठिकाणी निवडणूक रद्द होण्याचे निश्चित झाले होत़े यातून बिनविरोध सदस्य संख्या समोर आल्यानंतर 23 जून रोजी अक्कलकुवा आणि नंदुरबार या दोनच तालुक्यात मतदान होणार असल्याने प्रशासनाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आह़े  शहादा तालुक्यात निम्मे ठिकाणी निवडणूक रद्द होण्याची सलग तिसरी वेळ आल्याची माहिती देण्यात आली आह़े तालुक्यात  सदस्यपदाच्या सर्वाधिक 52 सदस्य आणि 1 लोकनियुक्त सरपंच पदासाठी कार्यक्रम हाती घेण्यात आला असताना मतदान होणार नसल्याने प्रशासनाने करुन ठेवलेली तयारी वाया जाणार आह़े धडगाव तालुक्यातील चुलवड येथील एका जागा बिनविरोध झाली़ तळोदा तालुक्यात सात जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या तर तीन ठिकाणी अजर्च प्राप्त होऊ शकले नाहीत़ नवापुर तालुक्यात सात ग्रामपंचायतीत प्रत्येकी एक सदस्यपदाची पोटनिवडणूक होती़ यातील पाच जागा बिनविरोध झाल्या तर दोन ठिकाणी अजर्च आलेले नाहीत़ एकीकडे बहुतांश ठिकाणी अर्ज नसताना अक्कलकुव्यात मात्र निवडणूकीची रणधुमाळी दिवसेंदिवस रंगत आह़े 

शहादा तालुक्यात सदस्यपदाच्या 52 तर लोकनियुक्त सरपंच पदाची एक अशा 53 ठिकाणी पोटनिवडणूक होती़ पैकी सदस्यपदाच्या 25 आणि करजई येथे लोकनियुक्त सरपंचपदाची 1 अशा 26 जागा बिनविरोध झाल्या आहेत़ उर्वरित 26 ठिकाणी अजर्च दाखल झालेले नसल्याने तेथील निवडणूक रद्द झाली़ बोराळे येथे सदस्यपदाच्या 2, नवानगर 3, तितरी येथे 3, करजई, उधळोद, गोदीपूर, कुढावद तर्फे सारंगखेडा, कुसुमवाडा, तोरखेडा, लंगडी भवानी, ब्राrाणपुरी, वडछील, त:हाडी, जुनवणे याठिकाणी सदस्य निवड बिनविरोध झाली़ तर शहादा तालुक्यातील  कु:हावद तर्फे सारंगखेडा येथे 2, ओझर्टा, परिवर्धे, बुडीगव्हाण, अलखेड, काकर्दे दिगर, पिंप्री, कमरावद येथे 3, मलोणी येथे 2, कजर्त येथे 2, सावळदा येथे 2, लक्कडकोट 2, काथर्दे खुर्दे,  टेंभे तर्फे शहादा, त:हाडी तर्फे बोरद, शिरुड दिगर, बुपकरी या ग्रामपंचायतीसाठी अजर्च दाखल न झाल्याने तेथील निवडणूक रद्द झाली आह़े याठिकाणी येत्या काळात नव्याने पोटनिवडणूक कार्यक्रम राबवला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आह़े 

तालुक्यातील पावला, वेळावद, नळवे खुर्द येथे सदस्यपदासाठी प्रत्येकी एक तर उमर्दे खुर्द येथे सदस्यपदासाठी दोन जागांसाठी 23 रोजी मतदान होणार आह़े तालुक्यात निमगाव, जांभीपाडा, केसरपाडा, करणखेडा, गुजरजांबोली, धुळवद, कोरीट, बलवंड, चौपाळे येथील सदस्यपदाच्या जागा बिनविरोध झाल्या़ तर बोराळे येथील 3, कलमाडी, खर्दे खुर्द, भोणे आणि चाकळे येथील प्रत्येकी एका जागेसाठी एकही अर्ज दाखल झालेला नाही़ येथेही येत्या काळात पुन्हा निवडणूक घेतली जाणार आह़े अक्कलकुवा तालुक्यातील राजमोही येथे 2, बेडाकुंड आणि आंबाबारी येथे प्रत्येकी 1 सदस्यपदाची पोट निवडणूक होती़ यातील बेडाकुंड येथे एकही अर्ज दाखल झाला नाही़ तर आंबाबारी येथील प्रभाग दोनमध्ये सदस्य बिनविरोध निवडून आल़े राजमोही येथे दोन प्रभागात 23 रोजी मतदान होणार आह़े