शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

शहाद्यात चोरीच्या दुचाकी विक्री करणारा पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 11:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : चोरीची दुचाकी विक्री करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : चोरीची दुचाकी विक्री करणाऱ्या मध्यप्रदेशातील एकास एलसीबीने अटक केली. त्याच्याकडून दोन चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान,महिनाभरात मोटरसायकल चोरट्या तीन जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ३५ पेक्षा अधीक वाहने जप्त करण्यात आली आहेत.करणसिंग कलरसिंग डावर, रा.पिपलाघर, ता.नेवाली (मध्यप्रदेश) असे संशयीताचे नाव आहे. शहादा येथे महागडी मोटरसायकल कमी किंमतीत एकजण विक्री करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेशन शाखेचे निरिक्षक किशोर नवले यांना मिळाली होती. त्यांनी लागलीच गस्तीवर असलेल्या पथकाला सुचना दिल्या. पथकाने डोंगरगाव चौफुलीवर तपास केला असता तेथे एकजण संशयास्पदरित्या आढळून आला. त्याला हटकले असता त्याने मोटरसायकलीसह पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी त्याला झडप घालून पकडले. त्याची चौकशी केली असता त्याने त्याचे नाव करणसिंग डावर असल्याचे सांगितले. सोबतची दुचाकी ही लंगडी भवानी येथील कन्हैय्यालाल जिवन पावरा यांची चोरल्याचे सांगितले. शिवाय शहादा शहरातून देखील एक दुचाकी चार महिन्यांपूर्वी चोरल्याची कबुली त्याने दिली.ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरिक्षक किशोर नवले, उपनिरिक्षक योगेश राऊत, हवालदार दिपक गोरे, योगेश सोनवणे, विकास अजगे, विजय ढिवरे यांच्या पथकाने केली.