चौधरी गल्लीत राहत असलेल्या कुसुमबाई प्रेमनाथ जगताप (५२) यांच्या घरातील कपाटाची चावी हरवली होती. त्यामुळे १४ फेब्रुवारी रोजी ललकारसिंग जलसिंग शिकलीकर (२३), रा. एकतानगर, नंदुरबार या बनावट चावी बनविणाऱ्यास चावी बनविण्यासाठी जगताप यांनी घरात बोलविले असता संशयिताने बनावट चावी तयार करून हातचलाखी करून कुसुमबाई यांच्या कपाटाच्या आतील तिजोरीच्या लॉकरमध्ये असलेले पाचशे रुपयाची शंभर नोटांचे बंडल असलेले तीन बंडल चोरून नेले.
याबाबत विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. विसरवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाने यांनी चौकशी करीत ललकारसिंग शिकलीकर यास १० एप्रिल रोजी शिताफीने अटक केली. त्यास न्यायालयात हजर करून १२ एप्रिलपर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली होती. प्रारंभी चोरीस नकार देत असलेला संशयितास पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने कबुलीजबाब दिला व त्यातील ४० हजार रुपये पोलिसांच्या ताब्यात दिले व उर्वरित रक्कम खर्च झाल्याचे त्याने सांगितले.