शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
3
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
4
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
5
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
6
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
7
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
8
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
9
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
10
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
11
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
12
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
13
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
14
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
15
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
16
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
17
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
18
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
19
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
20
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?

शहाद्याजवळ 7 लाखांचा गुटखा पोलीसांनी पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मध्यप्रदेशातून शहादा मार्गाने शिरपूरकडे वाहनाद्वारे तस्करी केला जाणारा अवैध गुटखा एलसीबीच्या पथकाने सापळा रचून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मध्यप्रदेशातून शहादा मार्गाने शिरपूरकडे वाहनाद्वारे तस्करी केला जाणारा अवैध गुटखा एलसीबीच्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतला़ 2 ऑक्टोबर रोजी रात्री झालेल्या या कारवाईतील मुद्देमालाची मोजणी पूर्ण झाल्यानंतर  गुरुवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आह़े   मध्यप्रदेशातून शहादा मार्गाने शिरपूर बंदी असलेला गुटखा विक्रीसाठी घेऊन जात असल्याची  माहिती एलसीबीच्या पथकाला मिळाली होती़ त्यानुसार पथकाने मध्यप्रदेश व महाराष्ट्र सिमेवर शहादा तालुक्यात सापळा रचला होता़ दरम्यान एमएच 20 ईजी 3135 हे संशयास्पद वाहन पथकाला दिसून आले होत़े वाहन थांबवून चौकशी केली असता, चालकाने उडवा उडवीची उत्तरे देत पथकाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता़ पथकातील कर्मचा:यांनी वाहनाची तपासणी केली असता, आतील भागात 7 लाख 4 हजार 400 रुपये किंमतीचा अवैध गुटखा पोत्यांमध्ये भरल्याचे दिसून आला़ प्रसंगी सौरभ प्रविण पाटील व भटू दगडू खलाणे दोन्ही रा़ वाघाडी ता़ शिरपूर जि़ धुळे यांना ताब्यात घेऊन शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़ सात लाखाच्या गुटख्यासह 4 लाख रुपयांचे पीकअप वाहन पथकाने ताब्यात घेतले आह़ेपोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनात एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस हेड कॉन्स्टेबल विकास पाटील, रविंद्र पाडवी, दिपक गोरे, पोलीस नाईक भटू धनगर, विजय ढिवरे, आनंदा मराठे, राजेंद्र काटके यांच्यासह कर्मचा:यांच्या पथकाने ही कारवाई केली़ गुटखा पकडल्याच्या कारवाईनंतर गुरुवारी रात्री एलसीबीच्या पथकाने खेड दिगर ता़ शहादा येथून एकास गावठी पिस्तूल आणि 2 काडतुसांसह ताब्यात घेतल़े एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर नवले यांना खेडदिगर परिसरात एकजण गावठी पिस्तुल घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार रात्री पावणेबारा वाजेच्या सुमारास पथकाने खेड दिगर येथे तपासणी केली असता बसस्थानक परिसरात एकजण बसून असल्याचे दिसून आल़े पथकाने त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून 25 हजार रुपयांचे गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक हजार रुपयांचे एक याप्रमाणे 2 काडतूस मिळून आल़े मुक्तार शेख मुसीर शेख रा़ शिरसाळे ता़ अमळनेर असे पिस्तुल बाळगणा:याचे नाव असून पथकाने त्यातस ताब्यात घेत म्हसावद पोलीस ठाण्यात हजर केले होत़े त्याच्या अवैध शस्त्र बाळगल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याची चौकशी करण्यात येत आह़े मध्यप्रदेश सिमेलगत पुन्हा नव्याने पिस्तूलांची तस्करी सुरु झाल्याने पोलीस सक्रीय झाले आहेत़ बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या कारवाईवेळी संशयास्पद वाहन थांबवण्याचा प्रयत्न पथकाने केला असता, चालकाने घटनास्थळावरुन पळ काढला होता़ वाहनाचा पाच किलोमीटर्पयत पाठलाग करुन पथकाने वाहन थांबवले होत़े वाहनाच्या मागील भागात पांढ:या रंगांच्या गोण्यांमध्ये गुटखा असल्याचे निदर्शनास आल्यानंतर दोघांना ताब्यात घेण्यात आल़े मध्यप्रदेशातील पानसेमल मार्गाने शहादा तालुक्याच्या मंदाणा परिसरातील मालकातर व तेथून बोराडी मार्गाने शिरपूर तालुक्यात हे वाहन जाणार होत़े मोठय़ा कालावधीनंतर अवैध गुटखा पकडण्याची कारवाई करण्यात आल्यानंतर तस्कारांचे धाबे दणाणले आह़े शहादा मार्गाने होणारी अवैध वाहतूक यामुळे थांबणार आह़े