शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबारात तंबाखूमुक्तीची 50 हजारांहून अधिक जण घेणार शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2018 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 31 मे रोजी सर्वत्र तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा करण्यात येणार आह़े त्यानिमित्त जिल्ह्यातील सुमारे 50 हजारांहून अधिक जण त्या दिवशी तंबाखू सेवन न करण्याची शपथ घेतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आह़ेराज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात तंबाखूमुक्तीचे काम मोठय़ा वेगात सुरू आह़े ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : 31 मे रोजी सर्वत्र तंबाखू सेवन विरोधी दिन साजरा करण्यात येणार आह़े त्यानिमित्त जिल्ह्यातील सुमारे 50 हजारांहून अधिक जण त्या दिवशी तंबाखू सेवन न करण्याची शपथ घेतील असा विश्वास जिल्हाधिकारी डॉ़मल्लिनाथ कलशेट्टी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आह़ेराज्यामध्ये नंदुरबार जिल्ह्यात तंबाखूमुक्तीचे काम मोठय़ा वेगात सुरू आह़े यात, सर्वसामान्य नागरिकांचेसुध्दा मोठे सहकार्य लाभत असल्याचे दिसून येत आह़े सुरुवातीला जिल्ह्यातील शाळा, विद्यालयांमध्ये तंबाखूमुक्तीसाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्यात आली होती़ त्यानंतर शाळा, विद्यालयाना विविध निकषांवर तंबाखूमुक्त करण्यात आल़े याला शाळा व्यवस्थापन समिती, विद्यार्थी, शिक्षक तसेच पालकांनीसुध्दा चांगला प्रतिसाद दिला़ परंतु आता ही तंबाखूमुक्तीची मोहीम एक चळवळ म्हणून समोर येताना दिसून येत आह़े 31 मे रोजी जिल्ह्यातील विविध शासकीय, निमशासकीय कार्यालय, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, शहरी तसेच दुर्गम भागातील रहिवासी आदींना तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात येणार आह़े पोलीस दलातील कर्मचा:यांनासुध्दा या दिवशी एकत्रित तंबाखूमुक्तीची शपथ देण्यात येणार आह़े जिल्ह्यातील दुर्गम भागात व्यसनमुक्ती तसेच तंबाखूमुक्तीचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी शिक्षक, मुख्यध्यापकांचा समावेश असलेले मास्टर ट्रेनरची नेमणूक करण्यात आली आह़े ते धडगाव, मोलगी आदी दुर्गम भागात जात तंबाखूमुक्तीबाबत प्रबोधन करणार आहेत़ विविध स्वयंसेवी संस्था संघटनासुध्दा सक्रियव्यसनमुक्तीच्या कार्यामध्ये सुरुवातीपासूनच विविध स्वयंसेवी संस्था तसेच संघटनांचा सक्रिय सहभाग राहिला आह़े त्यात, डेंटीस्ट असोसिएशन, लायन्स क्लब, रोटरी क्लब, आयएमए आदींचा समावेश आह़े व्यसनमुक्तीच्या चळवळीत डेंटीस्ट असोसिएशनतर्फे मोठी मदत होत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ़ मल्लिनाथ कलशेट्टी यांनी            सांगितल़े दरम्यान, केवळ एकाच दिवशी तंबाखूमुक्तीची शपथ घेऊन चालणार नसून तंबाखूमुक्तीची चळवळ निर्माण झाली पाहिजे, त्यामुळे यापुढेसुध्दा याबाबत प्रयत्न करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगण्यात आल़े सप्ताहाभर चालणा:या कार्यक्रमात तंबाखूमुक्त राहण्याबाबत शपथ देणे, सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची तंबाखूमुळे होणारे दुष्परिणाम याविषयी कार्यशाळा व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावरही शासकीय कार्यालयांमध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाकडून ठिकठिकाणी माहिती फलक लावण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आह़े