शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक कलांवत कला समृद्धीचा महत्त्वाचा ‘दुवा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 12:30 IST

संडे स्पेशल मुलाखत सातपुड्यातील भाषा आणि संस्कृती समृद्ध आहे़ कलारुपाने भाषेची मांडणी झाल्यास नंदुरबारात नाट्यकलेचा नवा अध्याय सुरु होईल-दत्ता पाटील

भूषण रामराजे ।लोकमत न्यूज नेटवर्कआदिवासी संस्कृती ही जगाला ज्ञान देणारी आहे़ भाषासमृद्ध असल्याने येथे कलावंत घडवताना स्थानिक बोलीभाषेचा वापर झाला पाहिजे़ जिभाऊ करंडक स्पर्धा ही या साठी मोठं व्यासपीठ असून येत्या काळात येथील कलावंतांसाठी नाट्यलेखन करुन त्यांना सर्व सहकार्य करणार असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ नाट्यलेखक दत्ता पाटील यांनी केले़ त्यांच्याशी केलेली ही बातचीत़प्रश्न : नाटकासाठी शुद्ध भाषेचा अट्टाहास योग्य आहे का?उत्तर : नंदुरबार हा आदिवासी जिल्हा आहे़ येथे एकापेक्षा अधिक भाषा आहेत़ हीच गत संपूर्ण खान्देशाची आहे़ भाषेचा हा लहेजा वापरुन अनेकांनी नाट्यस्पर्धेत यशही मिळवले आहे़ शुद्ध मराठी भाषा येत नाही, म्हणून त्यांनी त्यांच्यातला कलावंत किंवा लेखक का थांबवावा, इथल्या मुलांनी खरतंर आपली स्पंदने टिपून ती जगासमोर आपल्या भाषेत मांडणे गरजेचे आहे़ आपले प्रश्न हे कलेच्या माध्यमातून मांडता येतात़ शेतकरी आणि सामान्यांची मुलं त्या समस्या स्थानिक भाषेतून मांडून त्या अधिक ज्वलंतर करु शकतील़ यासाठी शुद्ध भाषा हा काही योग्य पर्याय नाही़प्रश्न : नाट्यलेखन किंवा कलावंतांची नवीन पिढी घडवण्यासाठी काय करायला हवं़ ?उत्तर : नंदुरबारसारख्या आदिवासी जिल्ह्यात १ स्पर्धा सतत १० वर्ष चालणं हेच याचं उत्तर आहे़ स्पर्धा असली की मग मुलांचा त्यात सहभाग वाढतो आणि यातून कलावंत घडवण्यास मदत होते़ प्रायोगिक रंगभूमी ही फक्त काही पुण्या-मुंबईपुरती मर्यादित नाही़ कलेच्या कक्षा ह्या अमर्याद असतात़ यातून त्या येथेपर्यंत पोहोचल्या आहेत़ नव्या कलावंतांनी आपले सामाजिक प्रश्न समजून घेत त्यावर विचार वाढवणे गरजेचं आहे़ सुरुवातच बाहेरच्या विषय घेऊन केल्यास प्रवास खुंटण्याची भिती असते़ नाशिक सारख्या छोट्या शहरातून नाट्यलेखक म्हणून भरारी घेताना मर्यादा होत्या़ परंतू तेथे सुरु झालेल्या स्पर्धांनी खरं बळ मिळालं, लिहिण्याची उर्मी मिळाल्यानेच इथवरचा प्रवास झाला़