शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

उच्च आवाजात डीजे वाजविणा:यांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : डीजे व वाद्याचा मर्यादेपेक्षा अधीक  आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोन सार्वजनिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : डीजे व वाद्याचा मर्यादेपेक्षा अधीक  आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी नंदुरबारातील दोन सार्वजनिक मंडळांच्या पदाधिका:यांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापुढेही या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली.गणपती स्थापना मिरवणुकीत कायद्याच्या मानकापेक्षा अधीक तीव्रतेच्या आवाजात वाद्य व डिजे वाजविण्यास बंदी आहे. नंदुरबारात ही मर्यादा दोन मंडळांनी तोडली. त्यामुळे पोलिसांनी स्वत: सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 2 रोजी सायंकाळी साडेसात वाजता म.गांधी पुतळ्याजवळ आणि दोशाह तकिया भागात सव्वानऊ वाजता या मर्यादेचा भंग झाल्याचे पोलिसांनी फिर्यादीत म्हटले आहे. पहिली फिर्याद फौजदार सुनील बि:हाडे यांनी दिली. त्यांच्या फिर्यादीवरून सुमित राजपाल, रा.सिंधी कॉलनी, खंडू भाईदास माळी व भूषण गोरख गवळी रा.माळीवाडा यांच्याविरुद्ध तर दुसरी फिर्याद फौजदार बि:हाडे यांनीच दिली. त्यावरून विक्की बालाजी चौधरी, किरण राजेंद्र बडगुजर रा.अमर कॉलनी, संजय उत्तम मराठे रा.सिद्धी विनायक चौक, नंदुरबार   यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि इतर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपास पोलीस निरिक्षक नंदवालकर करीत आहे.दरम्यान, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी सांगितले, यापुढे देखील या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार आहे. अशा प्रकारामुळे ध्वनी प्रदुषण होऊन सार्वजनिक शांततेचा भंग होतो. तसेच डीजे सिस्टिीमवरून उच्च आवाजात गाणी वाजविल्यामुळे वृद्ध इसम, आजारी व्यक्ती, लहान बालके यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊन सार्वजनिक सुरक्षिततेचा व शांततेचा भंग होतो. त्यामुळे सर्व गणेश मंडळ आणि इतर मिरवणुका काढणा:यांनी याची काळजी घ्यावी असे आवाहन देखील पंडित यांनी केले. 

ध्वनी प्रदुषण अधिनियमाचे उल्लंघन केल्यास पर्यावरण संरक्षण कायदा कलम 15 प्रमाणे पाच वर्ष कैद किंवा एक लाख रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गणेशोत्सव काळात कोणत्याही सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ, करमवणुकीच्या ठिकाणी ध्वनीक्षेपकाचा उपयोग मर्यादेपेक्षा मोठय़ा आवाजात करू नये. तसे झाल्यास नागरिकांनी थेट पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे.