लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयातील रक्त संकलन केंद्रात लवकरच प्लाझ्मा विलगीकरण उपकरण सुरू करण्यात येणार आहे. यामुळे कोरोनावरील उपचारासाठी त्याची मदत होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी दिली.कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्लाझ्मा थेरपीचा वापर वाढत आहे. नंदुरबारात देखील ही थेरपी वापरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी मात्र प्लाझ्मा वेगळे करणारे उपकरण येथील शासकीय रक्तपेढीत उपलब्ध नव्हते. आता हे उपकरण येथे उपलब्ध झाले आहे. लवकरच प्लाझ्मा घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या रक्तातून प्लाझ्मा घेतला जात असतो.जिल्ह्यात आतापर्यंत जेवढेही रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत त्यांचा सर्व डाटा प्रशासनाकडे उपलब्ध आहे. त्यातील अनेकजण स्वच्छेने जे प्लाझ्मा दानासाठी पुढे येतील त्यांचा प्लाझ्मा घेण्यात येणार आहे. त्यासाठी अनेकांनी आधीच तयारी दाखविली आहे. याबाबत संबधीत कोरोनामुक्तांना आवाहन देखील करण्यात येणार आहे. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण त्यामुळे आणखी वाढणार असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी स्पष्ट केले.
कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 12:43 IST