शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

झाडांची कत्तल केली, पण पर्यायी वृक्ष लागवड कधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 12:29 IST

महामार्गाचे नूतनीकरण : काम सुरू असतानाच वृक्ष लागवडीची मोहीमही राबवावी

नंदुरबार : विसरवाडी ते सेंधवा महामार्गाच्या नूतनीकरणासाठी अडीच हजारावर वृक्षांची कत्तल करण्यात आली. परंतु त्या मोबदल्यात राबवायची वृक्ष लागवड मोहीम संबंधित ठेकेदाराने अद्यापही सुरू न केल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नव्हे तर यंदाच्या दुष्काळी स्थितीला काहीअंशी ही घटनाही जबाबदार असल्याचे बोलले जात असून आतापासूनच वृक्ष लागवड मोहीम सुरू करण्याचा सूर व्यक्त होत आहे.जिल्ह्यातून विसरवाडी-सेंधवा हा महामार्ग जात असून त्यासाठी रस्त्यावर असलेल्या वृक्षांची मोठय़ा प्रमाणावर कत्तल करण्यात आली. अगदी 50 वर्षाहून जास्त वयाची मोठमोठे वृक्षही तोडली गेली. वास्तविक मुळासकट वृक्ष काढून तो जसाच्या तसा दुस:या ठिकाणी लागवड करण्याचे तंत्र विकसीत झाले असले तरी तो पर्याय न वापरता या महामार्गाच्या कामासाठी झाडे तोडण्यात आली. आज या घटनेला दोन वर्षे झाली. महामार्गाचे कामही अतिशय संथगतीने सुरू            आहे. सद्यस्थितीत या महामार्गावर कोळदा ते कोरीट फाटार्पयत काम झाले आहे. त्यातही मध्ये लहान शहादेजवळ जवळपास एक किलोमीटर व कोरीट फाटय़ाच्या अलिकडे अर्धा किलोमीटर काम अपूर्णच आहे. पुढे प्रकाशा ते डामरखेडा दरम्यान दोन किलोमीटर  काम झाले आहे. शहाद्यापासून पुढे टप्प्याटप्प्यात कामे सुरू असल्याने हा रस्ताच रहदारीसाठी अडथळ्याचा ठरला आहे. रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यांवरील खड्डे दुरुस्तीकडेही दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी सर्वात त्रासदायक रस्ता झाला आहे. याबाबत लोकांमध्ये संताप व्यक्त होत असतानाच दुसरीकडे वृक्ष लागवडीबाबतही बेपर्वाई केली             जात आहे. ज्या भागात रस्ता झाला किंवा ज्याठिकाणी जमीन संपादीत झाली अशा भागात वृक्ष लागवड वेळीच सुरू होणे आवश्यक आहे. एका झाडाच्या बदल्यात पाच           वृक्ष लागवड करण्याचे बंधन आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने आताच मोठे रोप आणून त्याची लागवड        केली तर सध्या रस्त्यावर पाणी मारण्याची कामे सुरू असल्याने झाडांनाही वेळेवर पाणी दिले जाईल. शिवाय त्याची काळजी घेतली जाईल. त्यामुळे वृक्षांचे संगोपनही होईल, अशा प्रतिक्रिया लोकांमध्ये व्यक्त होत आहेत.परंतु याबाबत प्रशासन व लोकप्रतिनिधींनीही बेफिकीरीची भूमिका घेतल्याने या रस्त्यावरील वृक्षतोड झालेल्या वृक्षांच्या बदल्यात पर्यायी वृक्षारोपण होईल की नाही याबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे. आज या रस्त्यावर सावलीसाठीही वृक्ष सापडणे दुर्मीळ झाल्याने त्याची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.