शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

प्लॅस्टिकबंदीच्या निर्णयाला नंदुरबारात उदासिनतेची किनार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 12:50 IST

संतोष सूर्यवंशीलोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 :वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान यामुळे राज्य शासनाकडून गुढीपाडव्यापासून म्हणजेच 18 मार्चपासून राज्यात प्लस्टिक बनावटीच्या ठराविक वस्तूंच्या खरेदी-विक्री, उत्पादन, साठवणूक आदींवर बंदी घालण्यात आली़ तसा प्लॅस्टिकबंदीचा कायदाच करण्यात आला़ राज्य शासनाकडून अत्यंत स्त्युत्य व पर्यावरणाच्या दृष्टीने दुरगामी परिणाम करणारा निर्णय घेण्यात आला असला ...

संतोष सूर्यवंशीलोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 21 :वाढत्या प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाचे होत असलेले नुकसान यामुळे राज्य शासनाकडून गुढीपाडव्यापासून म्हणजेच 18 मार्चपासून राज्यात प्लस्टिक बनावटीच्या ठराविक वस्तूंच्या खरेदी-विक्री, उत्पादन, साठवणूक आदींवर बंदी घालण्यात आली़ तसा प्लॅस्टिकबंदीचा कायदाच करण्यात आला़ राज्य शासनाकडून अत्यंत स्त्युत्य व पर्यावरणाच्या दृष्टीने दुरगामी परिणाम करणारा निर्णय घेण्यात आला असला तरी, याला जिल्ह्यात प्रशासकीय उदासिनतेची किनार असल्याचे दिसून येत आह़े राज्य संस्थेने निर्णय घ्यावे अन् प्रशासकीय यंत्रणेने त्याची अंमलबजावणी करावी, असे सर्वसाधारण आपल्या प्रशासकीय यंत्रणेचे धोरण आह़े परंतु नेहमीप्रमाणे यातही प्रत्यक्षात तसे होताना दिसून येत नाही़ प्लॅस्टिक बनावटीपासून बनविल्या जाणा:या पिशव्या, तसेच प्लॅस्टीक बनावटीच्या वस्तू जसे की, ताट, कप्स्, प्लेटस्, ग्लास, वाटी चमचे आदी वस्तूंच्या वापरावर व विक्रीवर बंदी घालण्यात आली आह़े याबाबत पर्यावरण खात्याचा आदेशही पालिका प्रशासनाला मिळाला आह़े  परंतु जिल्ह्यातील पालिका प्रशासनाकडून अद्यापर्पयत या विषयावर चकार शब्दही काढण्यात आलेला नाही़ किंबहुणा प्लॅस्टिक बंदी करण्यासाठी कार्यवाही करण्याअगोदरचा कृती आराखडाही पालिकांकडे अद्याप तयार झालेला नाही़ त्यामुळे प्लॅस्टिकबंदी कायद्याची गत ही याआधीच्या ‘महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा नियंत्रण कायदा 2006’ या सारखी होतेय की काय ? अशी धास्ती आता निर्माण होऊ लागली आह़े जिल्ह्यात अद्यापही अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तसेच तत्संम वस्तूंची बाजारात रेलचेल दिसून येत आह़े त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात प्लॅस्टिकबंदी कायदा केवळ कागदावरच असल्याचे सध्याचे चित्र आह़े अनेक वेळा प्लॅस्टिकबंदी खरोखर शक्य आहे काय? प्लॅस्टिकबंदी झाली तर मग  पर्यायी व्यवस्था काय? याबाबत शासकीय धोरण ठरलेय काय? असे एकना अनेक प्रश्नांची सरबत्ती करण्यात येत आह़े परंतु मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही, या युक्तीप्रमाणे प्लॅस्टिकचा वापर बंद केल्या शिवाय इतर पर्यायी साधनांचा शोध लागेल काय? असा प्रश्न निर्माण होता़े जिल्ह्यात अनेक स्वयंसेवी संस्था, बचत गट सक्रिय आहेत़ त्यांच्या माध्यमातून प्लॅस्टिकला पर्याय ठरु शकणा:या इतर साधणांची निर्मिती करता येणे शक्य आह़े परंतु यासाठी नगरपालिका, जिल्हा परिषद आदी प्रशासकीय यंत्रणांनी समन्वय साधत उपाय योजना करणे गरजेचे आह़े बचट गटांशी संपर्क साधत त्यांना कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आह़े परंतु अशा प्रकारे उपाय योजना करण्याची नगरपालिका प्रशासनाची इच्छाशक्तीच दिसत नाही़ राज्यात  ठराविक आकाराच्या, जाडीच्या प्लॅस्टिकवर बंदी घालण्यात आली असली तरी केवळ घोषणा किंवा कायदा संमत करुन भागत नसत़े त्याला कृतीची जोड देणे आवश्यक असत़े जवळपास अडीच-तिन महिन्यापूर्वी प्लॅस्टिकबंदीचा कायदा अंमलात आणला गेला़ परंतु या दरम्यानचा काळ पाहिल्यास नंदुरबारात या दिशेने कुठलेही पाऊल पालिका प्रशासनांकडून टाकले गेले नाही़ किंबहुणा या विषयाला दुय्यम स्थान पालिकांकडून देण्यात येत असल्याचे जाणवत आह़े जिल्ह्यात साधारणत रोज जमा होण्याच्या कच:यापैकी एक ते दीड टन हा केवळ प्लॅस्टिक कचरा आह़े शिवाय यावर पुर्नप्रक्रिया करण्यासाठी कुठलीही यंत्रणा अद्याप नाही़ त्यामुळे पर्यावरणाचा गंभीर प्रश्न यातून निर्माण होत आह़े जिल्ह्यातील व्यापारीवर्ग जळगाव तसेच गुजरातेतून मोठय़ा प्रमाणात प्लॅस्टिकच्या वस्तूंची आयात करीत असतो़ यात जिल्ह्यातील व्यापारी तसेच गुजरात स्थित असलेल्या प्लॅस्टिक उत्पादकांचेही मोठे आर्थिक गणित जुळलेले आह़े एकदम प्लॅस्टिकबंदी झाल्यास व्यवसायावर टाच येण्याचा कांगावा व्यापा:यांकडून करण्यात येत असला तरी, राज्य शासनाने केलेल्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी प्रशासकीय यंत्रणांना करणे  क्रमप्राप्त ठरेल़  व्यापा:यांनी प्लॅस्टिकचा माल त्वरीत संपवावा व नवीन मालाची आयात थांबवावी असा आदेश शासनाकडून देण्यात आला होता़ परंतु त्यालाही बरेच दिवस उलटल्याने आता प्लॅस्टिकबंदी कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी स्थानिक प्रशासकीय यंत्रणा कधी कामाला लागणार? हाच खरा प्रश्न निर्माण होत आह़े