शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पिण्याच्या पाण्याअभावी भाविकांचे हाल : कोचरा माता मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 12:43 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : शहादा तालुक्यातील कोचरा येथील कोचरा माता मंदिरावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने भाविकांचे हाल होतात. कोचरामाता देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे नवस फेडण्यासाठी भाविकांची कायम गर्दी असते.महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कोचरा येथे कोचरा मातेचे प्राचीन मंदिर आहे. वर्षातून आठ महिने या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 4 : शहादा तालुक्यातील कोचरा येथील कोचरा माता मंदिरावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नसल्याने भाविकांचे हाल होतात. कोचरामाता देवस्थान हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे नवस फेडण्यासाठी भाविकांची कायम गर्दी असते.महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या कोचरा येथे कोचरा मातेचे प्राचीन मंदिर आहे. वर्षातून आठ महिने या मंदिरावर मंगळवार व शुक्रवारी नवस फेडण्याचे कार्यक्रम होतात. ज्यांचा नवस मानलेला असतो त्यांच्याकडून येथे कुटुंबासह नातेवाईक, आप्तेष्ट व मित्र परिवाराला भोजन दिले जाते. गुजरात, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील भाविकांची या मंदिरावर दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी नेहमी गर्दी असते. मात्र याठिकाणी स्वयंपाक करण्यासाठी पाण्याची व्यवस्था नसल्याने लांब अंतरावरून येणा:या भाविकांचे हाल होतात. येथे आल्यानंतर भाविकांना आधी पाण्याची व्यवस्था करावी लागते. याठिकाणी जुनी पाण्याची टाकी निकामी ठरली असून नवीन पाण्याची टाकी बांधण्यात आली आहे. मात्र या टाकीची क्षमता फक्त दोन हजार लीटर पाण्याची आहे. याशिवाय एक जुनाट हातपंप आहे. या हातपंपातून पाणी काढण्यासाठी जास्त परिश्रम घ्यावे लागतात. येथे येणा:या भाविकांची संख्या चार ते पाच हजार असून पाण्याची टाकी मात्र फक्त दोन हजार लीटर क्षमतेची असल्याने या टाकीतील पाणी पुरत नाही. त्यामुळे भाविकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने नाराजी व्यक्त केली जाते.पाण्याच्या व्यवस्थेसाठी स्वतंत्र कूपनलिका आहे. मात्र विजेचे लोडशेडींग जर दिवसा राहिले तर ही कुपनलिकाही निरुपयोगी ठरते. त्यामुळे याठिकाणी येणा:या भाविकांची पाण्याअभावी गैरसोय होऊ नये म्हणून मंदिर ट्रस्ट व ग्रामपंचायतीसह लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून कायमस्वरुपी व्यवस्था करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.