शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

संचारबंदीतही तहान भागविण्यासाठी जलदूतांची कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे शहरावसीयांना नियमित वेळेवर पाणी पुरवठा व्हावा यासाठी धडपड करणारे कर्मचारी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : एकीकडे संचारबंदी आणि दुसरीकडे शहरावसीयांना नियमित वेळेवर पाणी पुरवठा व्हावा यासाठी धडपड करणारे कर्मचारी असे चित्र दिवसभरात नंदुरबारातील विविध भागात दिसून येते. अत्यावश्यक सेवेतील हा वर्ग थेट पंपींग स्टेशनपासून ते २५० पेक्षा अधीक झोनमध्ये वेळेवर पाणी पुरवठा करण्यासाठी राबतो आहे. पहाटे चार वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत अविरत सेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांविषयी शहरवासी समाधान व्यक्त करीत आहेत.सर्वत्र लॉकडाऊन आणि संचारबंदीची स्थिती, लोकं घरात बसूनच या स्थितीचा सामना करीत आहेत. घरात बसलेल्या लोकांना वेळेवर पाणी पुरवठा व्हावा. नियमित आणि पुरेसे पाणी मिळावे याची खबरदारी पालिकेचा पाणी पुरवठा विभाग नियमितपणे घेत आहे. यासाठी पाणी पुरवठा विभागाचे १०० पेक्षा अधीक कर्मचारी दिवसरात्र राबत आहेत.अशी आहे पाणीपुरवठा सिस्टिमनंदुरबारातील नळ जोडणीधारकांची संख्या जवळपास १६ हजारा पेक्षा अधीक आहे. या नळजोडणीधारकांना झराळी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातून दररोज किमान ८० लाख लिटर पाण्याचे वितरण करण्यात येते. त्यासाठी पालिकेने शहराच्या चारही बाजूंना जवळपास १५ जलकुंभाच्या सहाय्याने पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले जाते. शहरात सर्वात जुनी पाण्याची टाकी ही साक्रीनाका परिसरातील आहे. याशिवाय टिळक विद्यालयामागे, जिल्हा परिषद कार्यालयाजवळ, माळीवाडा, धुळेनाका, बुस्टरपंप, नवनाथ टेकडी, शांतीनगर, योगेश्वरनगर, नागाईनगर, देवमोगरा कॉलनी, परदेशीपुरा टेकडी, विरलविहार, हाटदरवाजा आदी ठिकाणी जलकुंभ आहेत.याशिवाय कलामंदीर आणि रंगारी विहिरीच्या कुपनलिकेतून अग्निशमनबंब, टँकर भरले जातात.१०० पेक्षा अधीक कर्मचारीपाणी पुरवठा विभागात १०० पेक्षा अधीक कर्मचारी कार्यरत आहेत. यात ७५ वॉलमन असून सात कर्मचारी झराळी पंपींग स्टेशनवर, ६ कर्मचारी जलशुद्धीकरण केंद्रावर तर इतर २५ कर्मचारी इतर कामासाठी आहेत. पाणी पुरवठा सेवा अत्यावश्यक सेवेमध्ये येत असल्यामुळे या सर्व कर्मचाºयांना पालिकेने मास्क व संचारबंदी काळात कामासाठीचे ओळखपत्र दिले आहेत.२४ तास कामपंपींग स्टेशनवरून पाणी जलशुद्धीकरण केंद्रात आणने, तेथून पाणी शुद्ध करून ते शहरातील १६ जलकुंभांमध्ये आणून तेथून झोननुसार पाणी पुरवठा करणे अशी कामे पाणी पुरवठा कर्मचाºयांना करावी लागतात. त्यासाठी २४ तास हा विभाग कार्यरत असतो.१७ हजार नळ कनेक्शनशहरात घरगुती, कमर्शियल आणि मिटरद्वारे पाणी देण्याचे एकुण १७ हजार नळ कनेक्शन आहेत. या कनेक्शनधारकांना पाणी पुरवठ्यासाठी एकुण २५० पेक्षा अधीक झोन करण्यात आले आहेत. पहाटे चार वाजेपासून ते रात्री ११ वाजेपर्यंत या झोनद्वारे पाणी पुरवठा अविरत सुरू असतो. अर्थात झोनप्रमाणे एक दिवसाआड व ४५ ते ५५ मिनिटे पाणी पुरवठा केला जात असतो.२५० झोनद्वारे सोडले जाते पाणी..नंदुरबारातील विभागनिहाय व लोकसंख्या आणि विस्तार निहाय झोन पाडण्यात आले आहेत. काही झोन मोठे तर काही झोन मोठे आहेत. मुख्य झोन व त्याचे उपझोन असे सर्व मिळून तब्बल २५० झोन आहेत. १६ जलकुंभद्वारे त्यातून पाणी सोडले जाते. त्याकरीता ७५ वॉलमन कार्यरत आहेत. ते आपल्या झोननिहाय ड्युटी बजावत असतात.